Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#BridFluUpdate महाराष्ट्रातही पक्ष्यांच्या नमुन्यांची तपासणी

Spread the love

अनेक राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झालेला आहे. हिमाचल प्रदेश, केरळ गुजरात आणि महाराष्ट्रात पक्षी मरत असल्याचे वृत्त आहे. हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, केरळ आणि उत्तर प्रदेश अशी सात राज्ये आहेत ज्यात बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. तर दिल्ली, छत्तीसगड आणि महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यात पक्ष्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आले आहेत.

कानपूर येथे चिमण्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू मिळाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. चार पक्ष्यांच्या मृत्यूनंतर तपासणी अहवालात बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. कानपूर आयुक्त राजशेखर यांच्या आदेशानुसार प्राणीसंग्रहालयाच्या सभोवतालचा परिसर रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तेथील रहिवासीही याबाबत सतर्क झाले आहेत. कानपुर प्राणिसंग्रहालयात दोन दिवसांत दहा पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने चार नमुने भोला प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तिथून या अहवालात बर्ड फ्लूची लक्षणे चौघांमध्ये आढळली.

दिल्लीत बर्ड फ्लूची पुष्टी नसली तरी राजधानीच्या विविध भागात पक्षी मरत आहेत. दिल्लीतील एका पार्कमध्ये 17 कावळ्यांचा मृत्यू झाला तर द्वारकाच्या डीडीए पार्कमध्ये 2 कावळ्यांचा मृत्यू झाला. त्याच वेळी दिल्लीतील संजय लेकमध्ये 10 बदके मारले गेले आणि मयूर विहार फेज -3 च्या उद्यानात तीन ते चार दिवसांपासून मृत कावळे सापडले आहेत. जीवंत पक्ष्यांच्या आयातीवर सध्यायापासा बंदी आहे. दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यात देखरेखीसाठी पथक तयार करण्यात आले असून पशुवैद्यकीय तज्ज्ञ निरंतर सर्वेक्षण करत असतात. संजय तलाव, भालास्वा तलाव आणि पोल्ट्री मार्केटवर लक्ष ठेवले जात आहे. मृत पक्ष्यांची माहिती देण्यासाठी 23890318 हेल्पलाईन क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे.

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री के.आर. राजू म्हणाले की, ”दोन जिल्ह्यात बदकांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हजारो बदकं मारले जातील. सरकार शेतकर्यांना नुकसानभरपाई देईल. आतापर्यंत 12 हजार बदके मेली आहेत, तर 36 हजारांचा बळी घेतला जाणार आहे. लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे.”

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मृत आढळलेल्या कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू विषाणूची पुष्टी झाली आहे. राज्याचे आरोग्य विभागाचे डॉ. अमित मालाकर म्हणाले की, ”आतापर्यंत 150 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. कावळ्यांमधील संक्रमणाची पुष्टी झाल्यानंतर पोल्ट्री फॉर्मचीही चौकशी केली जात आहे. त्यांनी सांगितले की H5N8 विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. तथापि, माणसांमध्ये या आजाराची उपस्थिती अद्याप व्यक्त झालेली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!