Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : थर्टी फर्स्ट साजरा करताय ? मग जरा जपून ,जाणून घ्या कुठेआहे जमावबंदी आणि कुठे आहे संचारबंदी ?

Welcome 2021 Greetings card Abstract Blinking Sparkle Glitter Particle Looped Background. Gift, card, Invitation, Celebration, Events, Message, Holiday Festival

Spread the love

मावळत्या वर्षाला निरोप देताना तुमची थर्टी फर्स्टची रात्र घरातच आपल्या कुटुंबियांसोबत साजरी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. दरम्यान मुंबईत गेट वे ऑफ इंडिया तसेच चौपाट्यांवर मोठी गर्दी उसळते. यंदा मात्र या सर्व ठिकाणांवर रात्री अकरानंतर संचारबंदी असल्याने या भागात कोणीही गर्दी करणार नाही त्यामुळे  रात्रीच्या संचारबंदीतच  घरातून सर्वांना यंदा नवीन वर्षाचे स्वागत करावे लागणार आहे.

सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना संसर्गाचा धोका व नवीन कोरोनाचे संकट लक्षात घेता  नवीन वर्षाचे स्वागत आणि थर्टी फर्स्ट साधेपणाने करण्याची सूचना केली आहे. त्यासाठी राज्यातील मुंबई, पुण्यासह सर्वच महापालिका क्षेत्रांत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी (कलम १४४ ) लागू  आहे. याशिवाय ३१ डिसेंबर म्हणजेच्या आजसाठी विशेष गाइडलाईन्सही जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यात अनेक सूचना व निर्बंधांचा समावेश करण्यात आला आहे. रात्री ११ वाजता संचारबंदी सुरू झाल्यानंतर ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकणार नाहीत. याशिवाय ११ नंतर रेस्टॉरंट, बार, पब येथे पार्टी करण्याची परवानगी नसेल. त्यामुळेच थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन रात्री ११ वाजताच आवरतं घ्यावं लागणार असून नंतर घरातूनच नवीन वर्षाचं स्वागत करावं लागणार आहे.

या भागात कुठे जमावबंदी तर कुठे संचारबंदी

शासनाने जारी केलेल्या गाइडलाईन्सचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी पोलीस तसेच सर्व संबंधित यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत. मुंबई व पुण्यात प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे ग्रामीण भागात थर्टी फर्स्टला मोठी गर्दी होते. ते लक्षात घेऊन तळेगाव दाभाडे नगर परिषद, चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, तळेगाव औद्योगिक वसाहत, चाकण औद्योगिक वसाहत, हिंजवडी आयटी पार्क या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. लोणावळा, अॅम्बी व्हॅली, लवासा, भुशी डॅम, मुळशी डॅम, ताम्हिणी घाट, सिंहगड रोड, खडकवासला, मावळ, मुळशी आणि हवेली या तालुक्यांमध्ये तसेच शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रांमध्येही जमावबंदी लागू आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी येथे रात्री १० वाजल्यानंतर सर्व कार्यक्रमांवर बंदी घालून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

या सूचना पाळा आणि कोरोना टाळा

– नागरिकांनी आज व १ जानेवारी रोजी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरातूनच साधेपणाने करावे.

– नागरिकांनी आज समुद्र किनारे, बागा, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.

– मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते. त्या दृष्टीने करोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी.

– कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिकांनी व १० वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

– नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. मिरवणुकाही काढण्यात येऊ नयेत.

– नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी दर्शनासाठी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्या.

– फटाक्यांची आतषबाजी करण्यास मनाई असेल. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

– कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सर्व संबंधित विभागांनी वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!