MaharashtraNewsUpdate : वर्षा राऊत चौकशी प्रकरणावर आठवले म्हणाले , “आपण बिडी पित नाही, त्यामुळे आपल्या ईडीची भीती वाटत नाही”

शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटीस आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी यांनी केलेल्या ट्विटला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी “किसमे कितना हैं दम, तो हम भी नही कुछ कम” अशी काव्यमय प्रतिक्रिया दिली आहे. तसेच “आपण बिडी पित नाही, त्यामुळे आपल्या ईडीची भीती वाटत नाही”, अशी मिश्कील टिपण्णीही आठवले यांनी केली. शिर्डीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी नेहमीच्या स्टाईलने या कोट्या केल्या.
वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर राऊत यांनी केलेल्या ट्विटची सर्वत्र चर्चा होत आहे. “आ देखे जरा किसमे कितना हे दम, असे ट्विट राऊत यांनी केले होते. त्यावर पत्रकारांनी आठवले यांना विचारले असता , त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये “किसमे कितना हैं दम, तो हम भी नही कुछ कम”, असे मिश्किल उत्तर दिले . ते पुढे म्हणाले कि , ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे. ती पक्ष पाहून काम करीत नाही. भाजपच्या लोकांनाही ईडीच्या नोटीसा येतात. मात्र, आपला असा कुठलाही व्यवसाय नाही. त्यामुळे आपल्याला ईडीची भीती नाही. बिडी पित नसल्याने ईडीची भीती वाटत नाही. पैसा कमावावा, पण तो सनदशीर मार्गाने कमावावा. योग्य ते कर भरावेत. कागदपत्रे पूर्ण करावीत. असे असेल तर कशाला अशी कारवाई होईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
पत्रकारांशी बोलताना आठवले पुढे म्हणाले कि , ईडीला माहिती देणारे अनेक जण असू शकतात. अंजली दमानिया यांनीही एकनाथ खडसे यांच्यासंबंधी अनेक तक्रारी केल्या आहेत. खडसे यांनी पक्षांतर करायला नको होते. अर्थात त्यांनी पक्षांतर केले म्हणून ईडी कारवाई करीत आहे, असेही नाही. त्यांना विधानसभेला संधी मिळाली नाही, म्हणून नाराज होण्याची गरज नव्हती. त्यांच्यासोबत संधी मिळू न शकलेल्या अन्य नेत्यांना आता जशी विविध ठिकाणी संधी मिळाली, तशीच खडसे यांनाही मिळाली असती. त्यांनी थोडे थांबायला हवे होते.
रामदास आठवले यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा
केंद्रीय सामाजिक न्याय व व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे दि 29 डिसेंबर रोजी औरंगाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे
सकाळी 11 वाजता : सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे आगमन
सकाळी 11:30 वाजता: औरंगाबाद जिल्ह्यातील योजनांची अंमलबजावणी विषयी आणि औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रोगाच्या प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि समाजकल्याण अधिकारी यांच्यासमवेत बैठक
(स्थळ सुभेदारी शासकीय विश्रामगृह) साय 8:20 वाजता: औरंगाबाद विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण