Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : खासगी बस आणि कारचा भीषण अपघात , ३ जण जागीच ठार

Spread the love

बीड -अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर पाथर्डी नजीक खासगी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कल्याण-निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराईजवळ रात्री उशिरा हा  अपघात झाला. सोमवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास सुभद्रा हॉटेल समोर त्रिभुनवाडी शिवारात खाजगी बस क्रमांक एम.एच. 38 x 8555 ही पुण्याहून नांदेडकडे जात असताना सँट्रो कार क्रमांक एम.एच. 12 सीडी 2917 ही पुण्याच्या दिशेने जात असताना धडक झाली.

रामभाऊ शंकरराव कदम, (वय 60, रा जायगाव ता.परळी जि. बीड) परमेश्वर लक्ष्मण काळे (वय 40, रा.धामणगाव ता.पाथ्री जि परभणी) आणि केशव विठ्ठल बोराटे (वय 23 रा मंठा जि जालना) अशी मृतांची नावं आहेत.  या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात सँट्रो कारचा जागीच चुराडा झाला. यामध्ये सँट्रो कारमधील 3 जण जागीच ठार झाले. स्थानिकांनी तातडीने जखमी व्यक्तीला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!