IndiaNewsUpdate : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे निधन

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे आज(सोमवार) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील मोतीलाल वोरा करोना पॉझिटिव्ह आढळले होते. परंतु, करोना संक्रमणावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली होती. मोतीलाल वोरा यांनी अनेक वर्षे काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच, त्यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल देखील बनवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेत्यांनी मोतीलाल वोरा यांच्या निधानाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
Congress leader Moti Lal Vohra (file photo) passes away at Fortis Escort Hospital in Delhi at the age of 93 pic.twitter.com/pCR8QHwXkh
— ANI (@ANI) December 21, 2020