Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCoronaUpdate : अनियोजित लॉकडाउनमुळे कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त , कोरोनाबाधितांची संख्या एक कोटीहून अधिक : राहुल गांधी

Spread the love

अनियोजित लॉकडाउनमुळे कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप  काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केला आहे . आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने कोटीचा आकडा पार केला आहे . शनिवारी यात नव्या २५,१५२रुग्णांची भर पडली आहे तर यातून बरं झालेल्यांची संख्या आता ९५.५० लाख इतकी झाली आहे.

या निमित्ताने मोदी सरकारवर टीका करताना रॉल गांधी यांनी म्हटले आहे कि ,  “कोरोना संक्रमणाचे रुग्ण आता एक कोटीच्या वर गेलेत. त्यात जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. अनियोजित लॉकडाउनच्या माध्यमातून कोरोना विरोधातली ही लढाई 21 दिवसात जिंकता येते असं पंतप्रधानांनी देशाला सांगितलं होतं. परंतु यामुळं देशातील कोट्यवधी लोकांच जीवन उद्ध्वस्त झालं.”

शनिवारी देशात कोरोनाच्या नव्या २५,१५२ रुग्णांची भर पडली. त्यामुळं देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी पेक्षा जास्त झाली आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारताचा अमेरिकेनंतर जगात दुसरा क्रमांक लागतो. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्याही ९५.५० लाख इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात ३४७लोकांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या १,४५,१३६ इतकी झाली आहे. दरम्यान ICMR च्या अहवालानुसार 18 डिसेंबर पर्यंत देशात कोरोनाच्या 16 कोटी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शुक्रवारी 11 लाख चाचण्या करण्यात आल्या. देशातील कोरोना पॉझिटिव्ह दर हा सात टक्के इतका आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!