Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर येऊ नका , बाबासाहेबांना ऑनलाईन अभिवादन करण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन

Spread the love

राज्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता  यावर्षी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाणदिनी (६ डिसेंबर) नागरिकांनी चैत्यभूमीवर गर्दी करु नये. तर आहे तिथूनच किंवा ऑनलाइन स्वरुपात बाबासाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. यासाठी चैत्यभूमीवरील कार्यक्रमाचे युट्यूबवरुन थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.


याबाबत मुंबई महापालिकेने म्हटले आहे कि , कोरोनाच्या काळात बंद असलेली विविध धार्मिक स्थळं आता खुली करण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही करोनाचा धोका कायम असल्याने या धार्मिक स्थळांवर गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे स्मृतीस्थळ असलेल्या दादर येथील चैत्यभूमीवर लाखोंचा जनसागर उसळलेला असतो. मात्र, यंदा कोरोनाचं संकट असल्याने चैत्यभूमीवर गर्दी होऊ नये त्यातून संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. यासाठी चैत्यभूमीवरुन बाबासाहेबांना ऑनलाइन स्वरुपात अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या वर्षी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महापालिकेकडून महापरिनिर्वाण दिनी पुरवण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधा अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच ‘गर्दी नको, नको संसर्ग – कोविडपासून करु आपलं नी आपल्यांचं रक्षण’ या टॅगलाईनद्वारे महापालिकेने नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. “चैत्यभूमीवर केवळ अभिवादनाचा शासकीय कार्यक्रम पार पडेल, त्यामुळे महापरिनिर्वाणदिनी तुम्ही जिथे असाल तिथूनच बाबासाहेबांना अभिवानदन करा,” असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

बाबासाहेबांना अभिवादनाचा कार्यक्रम युट्यूबवरुन ऑनलाइन प्रसारित केला जाणार आहे. त्यासाठी  http://bit.ly/abhivadan2020yt या लिंकवर जाऊन नागरिकांना आणि भिमानुयांना ऑनलाइन अभिवादन करता येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!