Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : नाही नाही म्हणता , ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला , सत्तांतराची प्रक्रिया सुरु करण्यास परवानगी

Spread the love

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही  मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  आपला पराभव मान्य करण्यास तयारनव्हते पण आता अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. अमेरिकेतील निवडणुका होऊन तीन ते चार आठवडे उलटले असून डोनाल्ड ट्रम्प निकाल आपल्या बाजूने येईल असा विश्वास वारंवार व्यक्त करत होते. मात्र निकाल आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षावर मोठे आरोप केले होते. निवडणुकीचा निकाल स्पष्ट असतानाही डोनाल्ड ट्रम्प आपला  पराभव मान्य करण्यास तयार नव्हते.  यासाठी त्यांनी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला पण त्यांना त्यात यश आले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर पराभव मान्य करण्यावाचून अन्य पर्याय नव्हता.

दरम्यान हि सर्व परिस्थिती लक्षात घेता , डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जीएसएला  सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे करण्याची गरज आहे ते करा असं सांगितलं आहे. यानंतर अमेरिकेच्या जीएसए एमिली मर्फी यांनी जो बायडेन यांना पत्र लिहिलं असून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत जीएसए एमिली मर्फी यांचे आभार मानले असून त्यांना धमकावलं तसंच छळ केल्याचाही आरोप केला आहे. आपण त्यांच्यासोबत किंवा त्यांचे कुटुंबीय आणि जीएसच्या कर्मचाऱ्यांसोबत असं होताना पाहू शकत नाही असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान इतके सर्व घडूनही  डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला लढा सुरुच राहील सांगताना विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!