Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पंतप्रधानांनी साधला ८ राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद , उद्धव ठाकरे यांनी दिली हि माहिती

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक  कोरोना संक्रमित आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी  व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि , कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशारितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे.

कोरोना स्थितीवर आयोजित बैठकीला महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, दिल्ली या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाची वर्तमान स्थितीची माहिती तसेच कोरोना लस वितरणासंदर्भातील तयारीबाबत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोना प्रतिबंधक लस कधी येईल हे आपल्या हातात नाही. आपले शास्त्रज्ञ लसीवर संशोधन करत आहेत, असं म्हटलं आहे.

दरम्यान पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरती वॅक्सीन तयार केलं जात आहे. या  वॅक्सीन निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे  हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ नोव्हेंबरला पुण्यात येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्त कार्यालयात त्यासाठी काल एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत या दौऱ्यात इतर काही देशांचे राजदूतही सहभागी होण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!