Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VidarbhaNewsUpdate : ह्रदयद्रावक : आजी -आजोबाला भेटण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीचा बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकून मृत्यू

Spread the love

आजी आजोबांकडे दिवाळी  सण साजरा करण्यासाठी  फराळाचे साहित्य घेऊन आपल्या कुटुंबीयांसमवेत जाणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावती  जिल्ह्यातील धारणी तालुक्यात घडली आहे. अस्मिता छगन भिलावेकर (१६, राहणार, भुलोरी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.  अस्मिता ही टेंब्रुसोडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत नवव्या इयत्तेत होती. अस्मिताचे आई, वडील, आजी आणि आजोबा हे तिच्या मावशीकडे दिवाळीच्या निमित्ताने मन्सूधावडी येथे बैलगाडीने निघाले होते.

रस्त्याने जात असताना अस्मिताच्या गळ्यातील ओढणी अचानक बैलगाडीच्या चाकात अडकली. अस्मिताच्या कुटुंबीयांनी गळफास सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, ओढणी काढता आली नाही. त्यामुळे तिला गळफास लागला आणि काही क्षणात तिचा मृत्यू झाला. अवघ्या १६ वर्षांच्या अस्मिताचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे रस्त्यावर आई-वडिलांनी एकच टाहो फोडला. त्यानंतर स्थानिकांनी आणि कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ऐन दिवाळीच्या सणात अस्मिताचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!