BiharPoliticalNewsUpdate : अखेर ठरलं !! नितीशबाबूच मुख्यमंत्री, उद्या शपथविधी , नितीशकुमार म्हणाले , मी इच्छुक नव्हतो पण ….

Advertisements
Advertisements
Spread the love

बिहारच्या निवडणुकीत एनडीएमध्ये सर्वाधिक जागा मिळवूनही आघाडीत बिघाडी होऊ नये म्हणून भाजपने मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नितीशकुमार यांना राजी केले असल्याचे वृत्त आहे. सत्तारुढ एनडीएच्या  आज पार पडलेल्या बैठकीत नितीशकुमार यांची सर्वानुमते नेतेपदी निवड करून हा तिढा सोडवण्यात आला. त्यामुळे , नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेतील , यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्यपालांना भेटण्याची औपचारिकता पूर्ण झाली असून उद्या सोमवारी दुपारी ४.३० वाजता शपथग्रहण सोहळा पार पडणार आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेईल हे मात्र अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आले नाही.


दरम्यान राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांसमोर मोठा खुलासा करताना नितीशकुमार म्हणाले कि , “माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. भाजापमधून कोणीतरी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटत होतं. पण भाजपाने केलेल्या आग्रखातर मी मुख्यमंत्री होत आहे”. याशिवाय  पत्रकरांनी जेंव्हा नितीश कुमार यांना उपमुख्यंत्रीदेखील उद्या शपथ घेणार का? असे तेंव्हा  ते म्हणाले की, “याची माहिती थोड्या वेळाने मिळेल. राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल”. सोमवारी दुपारी ४.३० वाजता शपथविधी पार पडणार असल्याची माहिती नितीश कुमार यांनी दिली आहे.

Advertisements

बिहार विधानसभेच्या नेता निवडीसाठी पाटण्यात नितीश कुमार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखील उपस्थित होते. या बैठकीची आणि नेता निवडीची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपविली होती त्यानुसार त्यांच्या उपसथीतीत हि बैठक घेण्यात आली . मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयातील विजयी मेळाव्यातच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच बिहारमध्ये सरकार बनेल असे सूतोवाच केले होते. एनडीएत भाजपकडे सर्वाधिक म्हणजेच ७४ आमदार आहेत. तर जनता जल युनायटेड (JDU)कडे ४३ आमदार आहेत. सहकारी पक्ष असलेल्या हम आणि व्हीआयपी यांच्याकडे प्रत्येकी ४-४ जागा आहेत. त्यामुळे एकूण संख्याबळ लक्षात घेता सातव्यांदा मुख्यमंत्री बनावे कि नाही यावर नितीशकुमार चिंतेत होते मात्र भाजपने स्वतः पुढाकार घेऊन नितीशकुमार यांचा विश्वास संपादन करीत त्यांचा होकार मिळवला.

Advertisements
Advertisements

दरम्यान नितीश कुमार यांची निर्विवाद एनडीएच्या नेते पदी निवड झाल्यानंतर हे सगळे नेते राजभवनाकडे रवाना झाले आणि राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे सरकार बनविण्याचा दावा केला. हा दावा मान्य करून राज्यपालांनीही तत्काळ नितीश कुमार यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यानुसार आता सरकारमध्ये कोण कोण मंत्री राहतील याची चर्चा सुरु आहे.

भाजपची रणनीती फसली

महाराष्ट्राचा अनुभव लक्षात घेता निवडणुकीत कमी जागा मिळाल्या असल्या तरी नितीशकुमार यांना नाराज करणे भाजपाला परवडणारे नव्हते त्यामुळे सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे भाजपने मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी  स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पुढाकार घेऊन नीतीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील असे आधीच घोषित करून टाकले होते. कारण निवडणूक निकाल आल्यानंतर जर भाजप आपल्या वचनापासून मागे सरला तर राज्यात महाआघाडीचे सरकार बनेल हे निश्चित होते. लोजपाचे नेते चिराग पासवान यांच्यामुळे भाजपाला अधिक जागा मिळाल्या असल्या तरी अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपला मजबुरीने हा निर्णय घ्यावा लागला हे उघड आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते बिहार विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. इतकेच नाही, तर चिराग यांच्या माध्यमातू नीतीश कुमारांना तीस ते ३५ जागांवरच रोखून धरण्याचा भाजपचा प्रयत्न होता मात्र त्यात त्यांना यश आले नाही. अर्थात भाजपचे हे राजकीय षडयंत्र यशस्वी न झाल्याने नीतीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यावाचून भाजपकडे कोणताही पर्याय उरला नाही. हि गोष्ट माहित असल्यानेच नितीशकुमार यांनी मौन धारण करीत आपली नाराजी व्यक्त केली होती. आता हे सरकार काय चालणार आणि किती दिवस चालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपलं सरकार