Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ” त्या ” दोघी एकत्र राहात होत्या , पुढे काय झाले ते तुम्हीच पहा….

Spread the love

उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोन तरुणींना जबरदस्तीने विभक्त करण्यात आले. त्यात एका तरुणीला घरात कोंडून ठेवण्यात आले. तर विभक्त होण्याला विरोध केला म्हणून दुसऱ्या तरुणीला मारहाण करण्यात आली.  अलहाबाद उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर शेजारच्या शामली जिल्ह्यातील दोन मुलींना पोलिस संरक्षण मिळाले. त्यानंतर चारच दिवसात बागपतमधील ही घटना समोर आली आहे.

या विषयीचे अधिक वृत्त असे कि, या दोन मुलींना एकत्र रहायचे होते. पण कुटुंबीयांकडून त्यांच्या जिवीताला धोका होता. एकत्र राहण्याची इच्छा असलेल्या या दोन मुलींना पोलीस संरक्षण मिळाल्यानंतर बागपतमध्ये लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या दोन तरुणींना कुटुंबीयांनी जबरदस्तीने विभक्त केले. रविवारची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

या वृत्तात पुढे म्हटले आहे कि , एका मुलीचे कुटुंबीय बागपतमधील त्यांच्या घरात घुसले व जबरदस्ती ते मुलीला घेऊन गेले. जेव्हा दुसऱ्या मुलीने याला विरोध केला, तेव्हा तिला सर्वांसमोर मारहाण करण्यात आली. “आम्ही एकत्र रहायचे ठरवले होते. आम्ही प्रौढ आहोत. आम्ही काय करतोय ते आम्हाला माहित आहे. पण आमच्या नातेवाईकांना आमचे नाते समजत नाही. शिक्षण क्षेत्रात समाजाची प्रगती घडवून आणण्यासाठी आम्हाला एकत्र काम करायचे आहे. संरक्षण देण्यासाठी आम्ही पोलिसांना लिखितमध्ये अर्जही केला होता. पण पोलीस काही करतील याआधीच माझ्यासोबत राहणाऱ्या मुलीचे नातेवाईक इथे आले. त्यांनी मला मारहाण केली, माझे कपडे फाडले व जबदस्तीने माझ्यासोबत राहणाऱ्या मुलीला घेऊन गेले” असे मारहाण झालेल्या मुलीने सांगितले. स्थानिक पोलीस मात्र या विषयावर काहीही बोलायला तयार नाहीत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!