Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharElectionResultUpdate : विजय कुणाचा ? देशाचे लक्ष आज बिहारकडे , सकाळी ८ वाजता होईल मतमोजणीला सुरुवात

Spread the love

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा  निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या मंगळवारी प्रारंभ होत आहे .  विधानसभेच्या सर्व २४३ जागांसाठी उद्या सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरवात होईल. मतमोजणीनंतर एका तासात निकालाचे कल लक्षात येतील तर  दुपारी २ ते ३ वाजेपासून प्रत्यक्ष निकालाला प्रारंभ होईल . निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व ३८ जिल्ह्यांत मतमोजणीसाठी ५५ केंद्रे बनवली आहेत. दरम्यान बहुतेक एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर सत्ताधारी नितीशकुमार यांच्या एनडीएला महाआघाडीच्या तुलनेत कमी जागा मिळतील, असे एक्झिट पोलचे निकाल आहेत.

नेहमीप्रमाणे प्रारंभी  मतपत्रिकांची मोजणी केली जाईल आणि त्यानंतर सकाळी ८.१५ वाजेपासून ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. ईव्हीएममधील एका फेरीच्या मतांची मोजणी करण्यासाठी १५ ते २० मिनिटं लागतील. तर पहिला कल सकाळी साडेआठ वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने सुमारे ६०० कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात केले आहेत. कोरोना व्हायरसमुळे मतमोजणी दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मतपत्रिका आणि ईव्हीएममधील मतांची वेळेत मोजणीत सुरू होणाऱ्यासाठी मतमोजणी करणाऱ्या कर्मचार्‍यांना सकाळी ६ वाजेपर्यंत मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचण्याआदेश देण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पाटण्यातील १४ विधानसभा मतदारसंघांपैकी फतुहा आणि बख्तियारपूर या दोन विधानसभा मतदारसंघाचे निकाल आधी लागतील. कारण इतर विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत या दोन विधानसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांची संख्या कमी आहे. फतुहा विधानसभा मध्ये ४०५ आणि बख्तियारपूर विधानसभेत ४१० मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे या दोन विधानसभा मतदारसंघांचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. दिघा, कुंम्हरार आणि बांकीपूर विधानसभा मतदारसंघांचे निकाल उशिरा लागलीत. दिघाच्या मतमोजणीला बराच वेळ लागले. पाटणा जिल्ह्यातील सर्व १४ विधानसभा मतदारसंघांसाठी ए. एन. कॉलेजमध्ये मतमोजणी केंद्र उभारण्यात आलं आहे. प्रत्येक विधानसभेची मतमोजणी दोन मंडपात होईल. त्याचबरोबर पाटणा साहिब विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची व्यवस्था ४ ठिकाणी करण्यात आली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!