Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील जनतेशी मुक्त संवाद

Spread the love

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला . आपल्यामुक्तसंवादात मुख्यमंत्री म्हणाले कि , आपण सर्व सण साधेपणाने साजरे केले. सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नागरिकांच्या सहकार्यामुळे आज आपण थोडेसे तणावमुक्त आहोत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर गर्दी वाढत आहे. सगळे व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. राज्यात सगळीकडे कोरोना कमी होत चालला आहे. मात्र आपण काळजी घेणं गरजेचं आहे. दिवाळीमध्ये काळजी घेणं गरजेचे आहे. दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणण्यापेक्षा आपणच त्यावर उपाय करणं गरजेचं आहे, सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका , असं ठाकरे म्हणाले. आज त्यांनी फेसबुकवरुन राज्यातील नागरिकांना संबोधित केलं.


महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलेलं महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान हे तोडून मोडून आपण उधळून लावलं आहे. आपण सगळे करोनाशी लढा देत असताना, संकटाशी लढत असताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी होय मी हा शब्द मुद्दाम वापरतो आहे, बदनामीचा कट केला होता. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्था कोलमडली आहे, इथे अंमली पदार्थांची शेती होते आहे असं चित्र निर्माण केलं. मात्र त्यांचं हे कारस्थान आपण उधळून लावलं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

माझ्यावर टीका झाली तरी चालेल…

मंदिराच्या बहुचर्चित विषयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले , मंदिरं कधी उघडणार? प्रार्थनास्थळं कधी उघडणार असा सवाल केला जात आहे. मंदिरं सुरु करताना पूर्ण काळजी घेतली जाईल. दिवाळीनंतर नियमावली करुन मंदिरं उघडणार असल्याचे ठाकरे म्हणाले. मंदिरावरुन माझ्यावर टीका केली जाते. मात्र राज्यातील लोकांसाठी आपण मंदिरं उघडायला उशीर करत आहोत. मात्र लवकरच नियमांसह मंदिरं उघडली जातील असं ठाकरे म्हणाले. मंदिर कधी उघडणार? असा सवाल करत माझ्यावर टीका होतेय, करू द्या. तुमच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी टीका सहन करायला मी तयार आहे. टीका करणारे ४ दिवस करतील परंतु उद्या गंडांतर आलं तर? माझ्यावर जबाबदारी आहे, असं ठाकरे म्हणाले. ठाकरे म्हणाले की,  मंदिर उघडणारच आहोत… परंतु त्यासाठी नियमवली बनवत आहोत. मंदिरात साधारण ज्येष्ठ नागरिक जातात, त्यांनाच तर आपण वाचवत आलो आहोत. प्रत्येक धर्मस्थळात आपण तल्लीन होऊन प्रार्थना करतो, परंतु त्यामुळे संक्रमण वाढायला नको, असं ठाकरे म्हणाले.

फटाकेबंदी पेक्षा प्रदूषण करणारे फटाके टाळण्याचे आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण जिद्दीने कोरोनाचा आलेख खाली आणला आहे. आपल्याकडे मुंबईत हजाराचा आकडा शेकड्यात आला आहे, राज्यातही नियंत्रणात. पण दिल्लीत किंवा अन्य ठिकाणी आकडा वाढत चालला आहे. पाश्चिमात्य देशात देखील, असं मुख्यमंत्री म्हणाले. फटाके बंदी आणता येईल, परंतु स्वत:हुन आपण बंधन घालुन घेऊ शकतो का? अनेकजण म्हणतात तुम्हीं बोलताना कुटुंबप्रमुखासारखे, मोठ्या भावासारखे वाटता, मग त्या नात्याने मी विनंती करतो. फटाकेबंदी पेक्षा प्रदूषण करणारे फटाके टाळण्याचे आवाहन मी करतो. अन्य ठिकाणी प्रदुषण अधिक आहे. हा आजार श्वसन संस्थेशी निगडित. प्रदुषणामुळे जर हा आकडा वाढत असेल तर दिवाळीत आपण फटाके वाजवणं थांबवू शकत का? असं मुख्यमंत्री म्हणाले.

पाश्चिमात्य देशांत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आली आहे. मात्र, आपल्या राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ येऊ नये यासाठी आतापासूनच काळजी घेण्याची गरज आहे.,अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. आज मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेसोबत संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी राज्यात करोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी प्रार्थनाही केली आहे. राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नालाही ओझरता स्पर्श केला . ते म्हणाले कि , कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!