Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : मंदिरं कधी उघडणार ? लग्नातील वऱ्हाडींची संख्या वाढविण्यावर राजेश टोपेंनी दिले हे उत्तर

Spread the love

काल नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असला तरी  राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. आणि कोरोनाची दुसरी आली तरी राज्य सरकार पूर्ण तयारीत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याच बरोबर मंदिरं कधी उघडणार ? आणि लग्नातील वऱ्हाडींची संख्या वाढविण्यावर यावर मुख्यमंत्री लवकरच आपला निर्णय जाहीर करतील असेही टोपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान युरोपीयन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे त्या देशांत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे देश आणि राज्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जाती आहे. मात्र राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी असून आली तरी राज्य सरकारची पूर्ण तयारी असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. त्याचबरोबर याआधी लग्नसमारंभात पन्नास लोकांना परवानगी दिली होती त्यांच्या संख्येत वाढ करण्याचा विचार सरकार करत असल्याचंही टोपे यांनी म्हंटलं आहे. तर मंदिरं उघडण्याबाबतचा निर्णय हा दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून घेतील अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना टोपे पुढे म्हणाले कि , कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईत आता कोरोना चाचणी मोफत होणार आहे. मुंबई महापालिकेकडून आजपासून 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे असल्यास नागरिक महापालिकेच्या हेल्पलाईनवर किंवा 1916 या क्रमांकावर संपर्क साधून जवळच्या केंद्राची माहिती घेऊन तिथे मोफत कोरोनाची चाचणी करु शकतात. मुंबईत आतापर्यंत केवळ 54 ठिकाणी कोरोनाची चाचणी केली जात होती. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणारे येणारे विविध दवाखाने, रुग्णालयांसह एकूण 244 ठिकाणी आजपासून मोफत वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यामुळे मोफत कोरोना चाचणीच्या ठिकाणींची संख्या वाढून जवळपास 300 होणार आहे. काही ठिकाणी आरटीपीसीआर पद्धतीची वैद्यकीय चाचणी; तर उर्वरित ठिकाणी अॅंटीजेन (Antigen) आधारित वैद्यकीय चाचणी उपलब्ध असणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!