Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात केवळ ५ हजार ९८४ नव्या  रुग्णांचे निदान , कोरोनमुक्तांच्या संख्येत मोठी वाढ

Spread the love

गेल्या २४ तासात महाराष्ट्रात केवळ ५ हजार ९८४ नव्या  रुग्णांचे निदान झाले आहे. तर १५ हजार ६९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण १३ लाख ८४ हजार ८७९ नवे करोना रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ८६.४८ टक्के एवढे झाले आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये १२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८१ लाख ८५ हजार ७७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख १ हजार ३६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख १४ हजार ५७७ व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर २३ हजार २८५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.  महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

दरम्यान राज्यात आज १ लाख ७३ हजार ७५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ५ हजार ९८४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १६ लाख १ हजार ३६५ इतकी झाली आहे. दरम्यान राज्यातील १५ हजार ६९ रुग्ण मागील चोवीस तासांमध्ये बरे झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण १३ लाख ८४ हजार ८७९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात राज्याचा रिकव्हरी रेट ८६.४८ टक्के इतका झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!