Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : विरोधकांची मागणी अखेर पूर्ण , मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

Spread the love

मुंबई : विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घराच्या बाहेर पडून  अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्याचा दौरा करावा अशी मागणी करीत टीका केल्यानंतर अखेर विरोधकांची हि मागणी मान्य करीत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  हे सोमवार, दि. 19 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून  शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत

सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण

सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारीने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे), सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा.

सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी, सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहराकडे प्रयाण, सकाळी 11:30 वा.अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, सकाळी 11:45वा. अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण,

दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी

दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण,

दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी,

दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण,

दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागतांच्या भेटी  व नंतर  सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

आपलं सरकार

Click to listen highlighted text!