Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : बाप रे !! सुधाकर शिंदे या परभणीच्या तरुण आयएएस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू … कोरोनाला गांभीर्याने घ्या….

Spread the love

मराठवाड्याचे भूमिपूत्र  , त्रिपुरा येथील अर्थ मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असलेले 2015 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोरोनामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे निधन झाले आहे. सुधाकर शिंदे हे त्रिपुरा केडरचे अधिकारी होते आणि सध्या त्रिपुरा राज्यात शिक्षण विभागात ते कार्यरत होते . ते मुळचे परभणी जिल्ह्यातील होते. सुधाकर शिंदे हे 34 वर्षांचे होते.

दोन आठवड्यांपूर्वी सुट्टी घेऊन सुधाकर शिंदे आपल्या कुटुंबीयांसह आपल्या वडिलांना आजी भावांना भेटण्यासाठी  गावी आले होते. परभणीच्या पालम तालुक्यातील उमरा गावात त्यांचे वडील आणि चार भाऊ राहतात. तेंव्हा इकडेच  त्यांना कोरोनाने गाठले . गावी  आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना नांदेड येथील गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती आणखीच खालवल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले. औरंगाबादवरून पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकला त्यांना हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

दिवंगत सुधाकर शिंदे हे त्रिपुरा येथे अर्थ मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते. सन २०१५ च्या बॅचमध्ये त्यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांचं शालेय शिक्षण परभणी येथील नवोदय विद्यालयात झाले. त्यानंतर औरंगाबाद येथून महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून ते पुणे व नंतर दिल्ली येथे युपीएससी परीक्षा देण्यासाठी गेले आणि २०१५ साली आयएएस अधिकारी झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पश्चात वडील चार भाऊ तीन बहिणी पत्नी व तीन वर्षाची मुलगी असा मोठा परिवार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!