Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : खोट्या टीआरपीसाठी लोकांना पैसे देऊन दाखवले जाताहेत इंग्रजी चॅनल, रॅकेटमधील दोघांना अटक

Spread the love

खोट्या टीआरपीसाठी  पैसे देऊन टीआरपीसाठी छेडछाड करण्यात असून  याप्रकरणी दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली  आहे. तसेच खोट्या टीआरपीसाठी रिपब्लिक चॅनेलचे नावही  पुढे येत असून यामुळे रिपब्लिक प्रमोटर्स जाळ्यात सापडले आहेत. टीआरपी प्रकरणात रिपब्लिकच्या खात्यांचीही  चौकशी होणार होणार असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

माध्यम क्षेत्रात खळबळ उडवणारी हि माहिती असून मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याचे  परमबीर सिंह यांनी म्हटले आहे. माध्यमांमध्ये टीआरपीला (TRP) अनन्यसाधारण महत्व आहे. काही माध्यमांनी एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंग मॅन्युप्युलेट केल्याचं समोर आलं आहे. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करणार असल्याचे मुंबई पोलीस परमबीर सिंह यांनी सांगितले आहे. याच संदर्भात मराठीतील फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिनीच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. टीआरपी रेटींगचं सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनीचा डेटा लिक झाल्याचीही माहिती मिळत आहे. यात कंपनीचे काही जुने तर काही विद्यमान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासाठी घरात विशिष्ट चॅनेल सुरु ठेवण्यासाठी पैसे दिले जात होते. दरम्यान, काही दिवसांपासून वादात असलेला रिपब्लिकचे चालकही यात सहभागी असल्याचा शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ते म्हणाले, “BARC ही संस्था टीआरपी मोजण्याचे काम देशात करते. ही संस्था वेगवेगळ्या शहरात बॅरोमीटर लावते, देशात सुमारे ३० हजार बॅरोमीटर लावण्यात आले आहेत. मुंबईत सुमारे १० हजार बॅरोमीटर बसविण्यात आले आहेत. बॅरोमीटर बसवण्याचे काम मुंबईतील हंसा नावाच्या संस्थेला देण्यात आले होते. तपासादरम्यान हंसांसोबत काम करणारे काही जुने कामगार टेलिव्हिजन वाहिनीवरून डेटा शेअर करत असल्याचे उघड झाले आहे. हे कामगार लोकांना घरात विशिष्ट चॅनल सुरु ठेवण्यासाठी पैसे द्यायचे. जे लोक अशिक्षित आहेत त्यांच्या घरी इंग्रजी चॅनेल पाहिले जात असल्याची माहिती आहे.

परमबीर सिंह म्हणाले, आम्ही हंसाच्या माजी कामगाराला अटक केली आहे. या आधारे तपास वाढविण्यात आला. दोन जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असून त्यांना ९ ऑक्टोबरपर्यंत कस्टडी देण्यात आली आहे. त्याच्या काही साथीदारांचा शोध घेत आहोत. काही मुंबईत आहेत तर काही मुंबईबाहेर आहेत. ते चॅनेलनुसार पैसे द्यायचे. पकडलेल्या व्यक्तीच्या खात्यातून 20 लाख रुपये जप्त करण्यात आले असून आठ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!