Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : जाणून घ्या सिरम- ऑक्सफर्डच्या कोरोना प्रतिबंधक लशीविषयी …

Spread the love

जगभर कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर असून  त्यावर मात करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक तयार करण्यासाठी सर्वत्र प्रयत्न चालू आहेत . सध्या भारतात सिरमकडून ऑक्सफर्डने बनवलेल्या लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. सिरमने अस्त्राझेनेकाप्रमाणेच अमेरिकन बायोटेक कंपनी कोडेजेनिक्स बरोबरही लस निर्मितीचा करार केला आहे.   सिरम इन्स्टिट्युट को रोनाला प्रतिबंध करणाऱ्या लशीचे १० कोटी अतिरिक्त डोस तयार करणार आहे.

कोविशील्ड संदर्भात मोठी घोषणा करताना सिरमकडूनकडून सांगण्यात आले कि , सीरम आणि गावी यांनी करोनावरची जी लस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे त्या लशीचे १० कोटी अतिरिक्त डोस तयार करण्यात येणार आहेत.  या लस निर्मितीच्या प्रक्रियेत बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचाही वाटा असून त्यामुळे १० कोटी डोस तयार करण्याच्या प्रक्रियेला हे  फाऊंडेशन गती देत आहे. भारतासाठी आणि आर्थिक दृष्ट्या मागास देशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. को रोनाचा फैलाव रोखणाऱ्या लशीच्या निर्मिती संदर्भात सिरमने फक्त ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच नाही, तर जगातील वेगवेगळया लस संशोधन करणाऱ्या संस्थांबरोबर करार केले असल्याचे सिरमकडून सांगण्यात आले आहे.

अशा घेतल्या जात आहेत चाचण्या

विशेष म्हणजे  ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने केईएम रुग्णालयात सुरू झालेल्या कोविडशील्ड लशीच्या वैद्यकीय चाचण्यांपाठोपाठ नायर रुग्णालयातही सोमवारपासून चाचण्या सुरू झाल्या आहेत. महिनाभरात दोन्ही रुग्णालयातील वैद्यकीय चाचण्या पूर्ण होणार आहेत. ऑक्सफर्डच्या करोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांसाठी मुंबईतील केईएम आणि नायर या दोन रुग्णालयांना परवानगी दिली होती. केईएम रुग्णालयात २६ सप्टेंबरपासून या चाचण्या सुरू झाल्या असून सोमवारपर्यंत ११ जणांना लस देण्यात आली आहे. नायरमध्ये ही सोमवारपासून चाचण्यांना सुरूवात झाली असून दोन दिवसांत आठ जणांना लस दिलेली आहे. प्रत्येकी १०० अशा दोन्ही रुग्णालयात २०० स्वयंसेवकांवर चाचण्या केल्या जात असून महिनाभरात चाचण्या पूर्ण होतील.

दरम्यान या चाचण्या घेण्यासाठी स्वयंसेवकाचे  वय १८ वर्षे पूर्ण असायला हवे तसेच त्याला करोनाची बाधा झालेली नसावी आणि इतर कोणतेही आजार नसावेत असे निकष ठरविण्यात आले आहेत. लस दिल्यानंतर काही तास स्वयंसेवकांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले जाते. त्यानंतर घरी सोडले जाते. घरी गेल्यावर त्यांना कोणते दुष्परिणाम आढळ्यास तातडीने संपर्क करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच डॉक्टरांकडूनही यांचा पाठपुरावा केला जातो. असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. दर दिवशी तीन ते पाच जणांना लस दिली जाते. आवश्यक त्या संर्पूण चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या व्यक्तीला लस देण्यासाठी दुसऱ्या दिवशी बोलाविले जाते. लशीच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच याचे परिणाम जाहीर केले जातील. तोपर्यत लस कोणाला दिली, काही दुष्परिणाम जाणवले का या सर्व बाबींबाबत चाचण्यांच्या करारानुसार गुप्तता पाळण्यात येईल, असेही केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!