IndiaNewsUpdate : वंचित बहुजन आघाडीचा आता बिहारमध्ये मोर्चा , एनडीएच्या विरोधात आघाडीचा मनोदय

Advertisements
Advertisements
Spread the love

वंचित बहुजन आघाडीने आता बिहारमध्ये धडक मारली असून स्वबळावर निवडणूक लढवण्याऐवजी आता आघाडी, युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात आपले राजकीय स्थान मिळविल्यानंतर आता उत्तर भारताकडे  मोर्चा वळवला आहे. वंचित आघाडीने बिहार विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ही निवडणूक स्वबळावर न लढवता समविचारी पक्षांशी आघाडी करून लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

Advertisements

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , ”बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुका देशाच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असं आम्हाला वाटतं. सर्व मिळून जर बिहारमधील एनडीएचं सरकार पाडलं तर केंद्रातील मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं, असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच आम्ही समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.”

Advertisements
Advertisements

आपलं सरकार