Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaEffect : आधी बाळ गेले आणि मग आई , अमरावतीत तरुण महिला डॉक्टरच्या मृत्यूने हळहळ…

Spread the love

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अनलॉक प्रक्रियेनंतर लोक गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास येत असून अमरावती मधील एका तरुण गर्भवती डॉक्टर महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे धक्कदायक वृत्त आहे. सदर महिला डॉक्टर ७  महिन्यांची गर्भवती होती. तिच्या मृत्यूच्या ५ दिवस आधीच तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता त्यानंतर महिलेचाही मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हि गर्भवती युवा महिला डॉक्टर अमरावती इथल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात पॅथॉलॉजी विभागात कार्यरत होती .  डॉ प्रतिक्षा वालदेकर (MBBS,MD) असे या डॉक्टरचे नाव आहे.

मृत्यूच्या पूर्वी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा देत असतानाच  त्यांना कोरोनाची लागण झाली त्यानंतर त्यांना उपचारासाठी आधी अमरावती  आणि  नंतर नागपूर येथे दाखल करण्यात आले होते.  मात्र आज डॉ. प्रतिक्षा वालदेकर यांचा उपचारा दरम्यान नागपूर इथं रुग्णालयात मृत्यू झाला. विशेष धक्कादायक बाब म्हणजे ५ दिवसांपूर्वी त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता. एका युवा डॉक्टरचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. त्यामुळे लोकांनी कोरोनाला अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!