Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशाची स्थिती चिंताजनकच पण रुग्ण बरे होण्याचा दर दिलासादायक , १० लाख रुग्णांवर चालू आहेत उपचार , ८३ हजार रुग्णांचा मृत्यू

Spread the love

गेल्या २४ तासात देशातील कोरोनाचा आतापर्यंतचा आकडा 50 लाखावर आजघडीला हि संख्या  51 लाख 18 हजार 254 इतकी झाली आहे  तर कोरोनामुळे 24 तासांत दगावल्याची संख्या 1 हजार 132  झाल्यामुळे मृतांचा आकडा 83 हजार 198 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्याही 40 लाखांहून अधिक आहे. आतापर्यंत 40 लाख 25 हजार 80 रुण बरे झाले असून बुधवारी विक्रमी 82 हजार 922 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशात सध्या 10 लाख 9 हजार 976 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  70.71 टक्के इतका झाले असून राज्यातील मृत्यूदर 2.75 % इतका आहे.

दरम्यान कोरोनाविरुद्ध लढा देत असताना भारतात सप्टेंबर महिन्यात मात्र खूपच चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मृत्यूदर आणि रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाची लागण होण्याचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात 15 दिवसांमध्ये 13 लाख 08 हजार 991 नवीन रुग्ण सापडले आहेत. ब्राझिलला मागे टाकत अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर 15 दिवसांत भारतात जवळपास 16 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू  झाला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात बुधवारी राज्यात 474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी बुधवारी राज्यात 23 हजार 365 नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. हा आकडा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत जास्त आहे.

काय आहे जगाची स्थिती ?

देशाबरोबर जगभरातही कोरोनाचा कहर चालूच असून बुधवारी कोरोनाच्या आकड्यांनी एक नवा रेकॉर्ड केला आहे. आता जगभरात एकूण संसर्गांची संख्या वाढून 3 कोटींपेक्षा जास्त झाली आहे तर  कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या आता 2 कोटी 17 लाखांहून जास्त झाली आहे. दरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात  9 लाख 44 हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2 कोटीपर्यंत असणारी कोरोना रुग्णांची संख्या अवघ्या 39 दिवसांत 3 कोटींच्या पार गेली आहे. म्हणजे संसर्गाची गती आता अधिक वेगाने होत आहे. साधारण 100 वर्षांपूर्वी फ्लूमुळे 50 कोटी जणांना संसर्ग झाला होता. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल आणि प्रिव्हेंशननुसार 1918-19 मध्ये एन्फ्लुएंजामुळे जगातील 50 कोटी लोकांना संसर्ग झाला होता. त्यावेळी जगात एक तृतीयांश लोकसंख्येला संसर्ग झाला होता. मात्र अद्याप कोरोनाचा कहर इथपर्यंत पोहोचलेला नाही. WHO शी संबंधित वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की कोरोनाचा संसर्ग सध्या प्रारंभीच्या  काळात असून त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संसर्गाविषयी बोलताना संयुक्त राष्ट्र संघाचे सचिव जनरल एंटोनिया गुटरेस यांनी सांगितले की, जगभरात कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. जर कोविड – 19 शी लढायचं असेल तर जगातील सर्व देशांना एकत्र यायला हवं. आणि एकत्र येऊन या महासाथीशी लढावं लागेल. सध्याच्या काळात जगाला सर्वात मोठा धोका कोणता असेल तर तो कोरोना व्हायरस महासाथीशी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!