IndiaCrimeNewsUpdate : कर्नाटकात तीन पुजाऱ्यांची हत्या

Spread the love

कर्नाटकातील मांड्या शहरातील गुट्टालू येथे श्री अराकेश्वरा मंदिराच्या प्रांगणात शुक्रवारी सकाळी तीन पुजाऱ्यांची  क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली  असल्याचे वृत्त आहे .  तिन्ही पुजाऱ्यांची ओळख पटवण्यात आली आहे. गणेश, प्रकाश आणि आनंद  अशी त्यांची नावे आहेत . दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली. मंदिराचे दरवाडे उघडले तेंव्हा या तिघांचे मृतदेह रक्तांच्या थारोळयात पडलेले होते.  दानपेटीत जमा होणारी रक्कम चोरण्याच्या हेतूने ही हत्या झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान आरोपींनी दानपेटीतून रोख रक्कमेच्या नोटा नेल्या परंतु नाणी मात्र तशीच ठेवून हल्लेखोर पसार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही मृत पुजारी चुलत बंधू होते . मंदिराच्या संपत्तीच्या सुरक्षेसाठी तिघेही प्रांगणातच झोपायचे असे पोलिसांनी सांगितले. तिन्ही पुजाऱ्यांची झोपेत असताना हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे. कारण कोणताही प्रतिकार झाल्याचे पुरावे आढळलेले नाही. या हत्येमध्ये तीनपेक्षा जास्त आरोपी सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. प्राथमिक तपासात दरोडा हाच हत्येचा उद्देश दिसत आहे. कारण हुंडी मंदिराच्या प्रांगणात पडलेल्या होत्या. त्यातील रोख रक्कम हल्लेखोरांनी काढून नेली. मांड्या पोलीस आरोपींना शोधण्यासाठी श्वानांची मदत घेत आहेत तसेच घटनास्थळावर फॉरेन्सिक तज्ज्ञांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

आपलं सरकार