CoronaVirusNewsUpdate : एका नजरेत जाणून घ्या देश , दुनिया आणि महाराष्ट्राची स्थिती , WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केले हे धक्कादायक मत….

Spread the love

World  Coronavirus Cases : 2, 78, 32,789 ।   Deaths: 90, ०3, 473   । Recovered:   1, 99, 10, 417  [ Worldometers ]

ACTIVE CASES  70, 18, 899   ।  Currently Infected Patients in Mild Condition : 69, 58, 464 (99%) 

Serious or Critical : 60,435 (1%)

CLOSED CASES : 2, 08, 13,890 ( Cases which had an outcome) 

Recovered / Discharged : 1, 99, 10, 417 (96%) ।  Deaths : 9, 03, 473 (4%)


India  Coronavirus Cases : 44, 17, 550 ।   Deaths: 74, 367   । Recovered:  34, 33, 604 [ Source : Worldometers ]

ACTIVE CASES  70, 18, 899   ।  Currently Infected Patients in Mild Condition : 69, 58, 464 (99%) 

CLOSED CASES : 35, 07,971 ( Cases which had an outcome) 

Recovered / Discharged : 3,433,604 (98%) ।  Deaths : 74,367 (2%)


India  : Active 897394  (20.53%) ।  Discharged : 3398844  (77.77%) ।  Deaths 73890   (1.69%) [ स्रोत : भारत सरकार ]


Maharashtra : Active Cases : 2, 43, 809 | Recovered / Discharged : 6, 72, 556 | Death : 27, 407  [ स्रोत : भारत सरकार ]


केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात १० लाख लोकसंख्येमागे केवळ तीन हजार २०१ करोना रुग्ण आहेत. हे प्रमाण जगभरातील नीचांकी प्रमाणापैकी आहे. तर भारतात १० लाख लोकसंख्येमागे ५३ करोनामृत्यू झाले आहेत. याबबातची जागतिक सरासरी ११५ आहे. तर  देशातील एकूण करोनामृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू हे महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांमध्ये आहेत. तर सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६२ टक्के रुग्ण या पाच राज्यांमध्ये आहेत.

कोरोनाच्या आजारामुळे जगभरात ९ लाखांहून  अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोना महासाथीचा आजार हा शेवटचा नसून येणाऱ्या  काळातही अशाच प्रकारची संकटे येणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. याबाबत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अ‍ॅड्नॉम गेब्रेयसस यांनी म्हटले आहे की, कोरोनाची महासाथ ही शेवटची नाही. महासाथीचे आजार हे मानवी जीवनाचा एक भाग असल्याचे इतिहास आढळते. मात्र, पुढील महासाथीचा आजार येण्याआधीच आपल्याला त्याचा मुकाबला करण्यास सज्ज राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान, संशोधनात अनेक देशांनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र, त्याच वेळेस सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर योग्य प्रकारे लक्ष दिले नसल्याचेही समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळेस पुढील महासाथीचा आजार येईल तेव्हा आपण त्याचा सामना करण्यासाठी सज्ज असायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

जगभरात आजघडीला कोरोनामुळे  ९ लाखांहून  अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनाबाधितांची संख्या ही दोन कोटी, ७८ लाख ३२ हजार ७८९ इतकी झााली आहे. कोरोनाचा सर्वाधिक मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत ६५ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, एक लाख ९४हजार ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागला आहे. भारतात बाधितांची संख्या ४४ लाख १७ हजार ५५०झाली असून ७४ हजार ३६७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून भारतात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे.

रशियन लसनिर्मिती प्रगतीपथावर

कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लास तयार करण्याचे कार्य प्रगती पथावर असले तरी रशियाने आपल्या नागरिकांसाठी जगातील पहिली करोना प्रतिबंधक लस जारी केली आहे. ‘स्पुटनिक व्ही’ या लसीचा  पहिला टप्पा  सामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला  आहे. या लशींनी सर्व प्रकारच्या गुणवत्ता चाचण्या पार केल्या असून सामान्य नागरिकांना लस उपलब्ध असल्याची माहिती रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली असून त्याचे जागतिक नियोजन WHO करणार आहे. स्पुटनिक व्ही या रशियन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी याच आठवड्यात सुरू होणार आहे. याआधी रविवारी मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या राजधानीतील बहुतांशी लोकांना काही महिन्यातच कोरोनाची हि लस टोचण्यात येणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी या लशीला मंजुरी दिली असल्याची घोषणा केली होती. हि लस मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने संरक्षण मंत्रालयासोबत विकसित केली आहे.

 

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.