IndiaNewsUpdate : उद्ध्वस्त होत असलेल्या अर्थव्यवस्थेवर राहुल गांधी यांचे भाष्य, मोदी सरकारवर टीकास्त्र

GDP reduces by 24%. The worst in Independent India's history.
Unfortunately, the Govt ignored the warnings.
GDP 24% गिरा। स्वतंत्र भारत के इतिहास में सबसे बड़ी गिरावट।
सरकार का हर चेतावनी को नज़रअंदाज़ करते रहना बेहद दुर्भाग्यपूर्ण है। pic.twitter.com/IOoyGVPLS2
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 31, 2020
कोरोना व्हायरसच्या काळात एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. जीडीपीच्या या घसरणीवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. सरकारने प्रत्येक इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
जीडीपी २४ टक्यांनी घसरला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण आहे. प्रत्येक इशाऱ्याकडे सरकारने दुर्लक्ष करणं हे अतिशय दुर्दैवी आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. राहुल गांधी यासंदर्भात ट्विट केलंय. या ट्विटमध्ये राहुल गांधींनी स्वत: चा एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत राहुल गांधी हे अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर सरकारला सल्ला देताना दिसत आहेत.
टाळेबंदीत ढासळली देशाची अर्थ व्यवस्था
केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी जाहीर केली. आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २३.९ टक्के इतकी ऐतिहासिक घसरण नोंदवली गेली आहे. जुलैमध्ये आठ उद्योग क्षेत्रांचे उत्पादन ९.६ टक्क्यांनी घटले आहे. पहिल्या तिमाहीत स्थिर किमतींवर वास्तविक जीडीपी २६.९० लाख कोटी रुपये होती. जी गेल्या वर्षी याच काळात ३५.३५ लाख कोटी रुपये होती. अशा प्रकारे यात २३.९ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी या काळात जीडीपीमध्ये ५.२ टक्के वाढ झाली होती. दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनाचा मोठा फटका असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (एनएसओ) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीमधून समोर आलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून २०२० या तिमाहीत तब्बल २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. सलग दोन तिमाहींमध्ये जीडीपीत घट झाल्याचे चित्र दिसत असून सध्या सुरु असणाऱ्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीतही ही घट कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारताच्या वास्तविक (रियल) जीडीपीमध्ये २६.९ लाख कोटींची घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही घट २३.९ टक्के इतकी आहे. नाममात्र (नॉमिनल) जीडीपी ३८.०८ लाखांनी घसरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही घट २२.६ टक्के इतकी आहे. २२.८ टक्क्यांनी अर्थव्यवस्थेची सरासरी घसरण झाली आहे. जीडीपीमध्ये १८ टक्क्यांची घट होईल असा अंदाज ब्लुमबर्गने ३१ अर्थतज्ज्ञांचा हवाला देत व्यक्त केला होता. मात्र कोरोनामुळे पहिल्यांदाच भारतीय अर्थव्यवस्थेची एवढी मोठी पडझड झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील ही चौथी मंदी असून यापूर्वी १९८० च्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये घट झाली होती. तिमाही पद्धतीने जीडीपीची माहिती गोळा करण्यास १९९७-९८ मध्ये सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली आहे.
दरम्यान कोरोनामुळे स्थानिक पातळीवरील टाळेबंदीचे टप्पे आणि करोनाचा वाढता प्रादुर्भाव यांचा जोरदार फटका बसल्याने चालू आर्थिक वर्षांच्या सुरुवातीलाच आर्थिक व्यवहारांना फार मोठय़ा प्रमाणावर खीळ बसली. जगातील सर्वात मोठय़ा २० अर्थव्यवस्थांपैकी ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत, जूनला संपलेल्या तिमाहीत सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली. आर्थिक वाढीत २१.७ टक्क्य़ांची वार्षिक घट हे त्या देशातील सर्वात मोठय़ा मंदीचे निदर्शक आहे. तथापि, संघटित क्षेत्रांपेक्षा लघुउद्योग क्षेत्र आणि अनौपचारिक क्षेत्र यांना अधिक फटका बसल्याचे लक्षात घेता, या आकडय़ांमधून आर्थिक संकटाचे खरे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अतिशय कमी गुंतवणूक, भांडवली खर्च आणि उपभोग्य मागणी यांचा उत्पादन, बांधकाम, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फटका बसला आहे. त्याचवेळी, एप्रिल- जून या तिमाहीत कृषी क्षेत्रातील वाढ ३-४ टक्क्य़ांदरम्यान असल्याचे आढळले आहे. राज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये टाळेबंदी जाहीर केल्याने, दुसऱ्या तिमाहीत वसुलीचे प्रमाणही अपेक्षेनुसार वाढलेले नाही.