Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronamaharashtraUpdate : चिंताजनक : पोलिसांमध्येही कोरोबाधितांची संख्या वाढू लागली… अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजार ७७२

Spread the love

महाराष्ट्रातील करोनाने  मृत्यू पावलेल्या पोलिसांची संख्या १५३ वर पोहोचली असून  गेल्या २४ तासांत राज्यात पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधित पोलिसांमध्ये १५७४ अधिकारी आणि १३ हजार २१८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात २ हजार ७७२ अॅक्टिव्ह पोलिस असून त्यातील ३५८ अधिकारी आणि २ हजार ४१४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत १५१ पोलिसांना लागण झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ११ हजार ८६७ पोलिसांनी करोनाची लढाई जिंकली आहे. त्यातील १२०१ अधिकारी आणि १० हजार ६६६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, राज्यातील १५३ पोलिसांनी करोनाची झुंज अपयशी ठरली आहे. त्यात १५ अधिकारी आणि १३८ कर्मचारी आहेत.

दरम्यानवरिष्ठ पोलीस अधिकर्त्यांनी सांगितले कि ,  पोलिसांमधील करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पोलिस प्रशासनाने  काही उपाययोजनाही आखल्या असून  कंटेन्मेंट झोनमध्ये तैनात असलेल्या पोलिसांना ड्युटीनंतर दोन ते तीन दिवसांची सुट्टी देण्यात येत आहे. जेणेकरून त्यांना विश्रांती घेण्यास वेळ मिळेल.

गृह विभागाची कामगिरी 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार , लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ४३ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३४ हजार ०१७ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २३ कोटी ३६ लाख ४४ हजार ३९४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २८ ऑगस्ट या कालावधीत

अत्यावश्यक सेवेसाठी ८ लाख ०३ हजार ३२० पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३४० (८९१ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ११ हजार १७१

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७

जप्त केलेली वाहने – ९६,०६४

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस 

मुंबईतील ६२ पोलीस व ७ अधिकारी अशा एकूण ६९, नवी मुंबई २, ठाणे शहर १७, पुणे शहर ३, नागपूर शहर ५, नाशिक शहर २, अमरावती शहर १ wpc, औरंगाबाद शहर ३, सोलापूर शहर ३, ठाणे ग्रामीण ३ व १ अधिकारी, पालघर २ व १ अधिकारी, रायगड ३, पुणे ग्रामीण २, सांगली १, सातारा २, कोल्हापूर १, सोलापूर ग्रामीण १, नाशिक ग्रामीण ५, जळगाव  २, अहमदनगर ३, उस्मानाबाद १, बीड १, जालना १, बुलढाणा १, मुंबई रेल्वे ४, पुणे रेल्वे अधिकारी १, औरंगाबाद रेल्वे १, SRPF Gr 3 जालना-१, SRPF Gr 9 -१, SRPF Gr 11 नवी मुंबई १, SRPF Gr 4 -१ अधिकारी, ए.टी.एस. १, PTS मरोळ अधिकारी १, SID मुंबई २ व १अधिकारी

कोरोना बाधित पोलीस – ३५९ पोलीस अधिकारी व २४१३ पोलीस कर्मचारी

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!