सुपरहिट दिग्दर्शक निशिकांत कामत हैद्राबादच्या रुग्णालयात दाखल

Spread the love

बॉलिवूडचे प्रसिद्ध  दिग्दर्शक निशीकांत कामतची प्रकृती खालावली आहे. हैदराबादमधील खासगी रुग्णालयात निशीकांतवर उपचार सुरु आहेत. निशीकांतला काही दिवसांपासून यकृताचा आजार होता, त्याचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यासारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशीकांत कामतने आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. त्याआधी डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशीकांत कामत हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचीत झालं. डोंबिवली फास्ट चित्रपटाला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. याव्यतिरीक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशीकांत कामतने खलनायकाची भूमिका केली आहे. २०२२ साली निशीकांतचा दरबदर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणं अपेक्षित आहे.

आपलं सरकार