Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaPuneNewsUpdate : खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांची लूट चालूच….

Spread the love

राज्य शासनाकडून खासगी रुग्णालयांनी सर्वसामान्य रुग्णांची लूट थांबवावी म्हणून अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी अनेक खासगी रुग्णालये सुधारायला तयार नाहीत . अशाच एका वृत्तानुसार पुण्यात मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी थेट पुना हॉल्पिटलमधील गलथान कारभार चव्हाट्यावर आणला आहे. महापालिकेकडून देण्यात आलेल्या बेडवर भर्ती असलेल्या पेशंटची कशी लूट सुरू आहे, याचा नगरसेवक वसंत मोरे यांनी पुराव्यानिशी भंडाफोड केला आहे. हॉस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकलमधून रूग्णाच्या नावाने आणलेली औषध वापरलीच जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी कि , सहा दिवसांपूर्वी पुना हॉस्पिटलमध्ये विलास गोणभरे नावाच्या रूग्णाला प्रकृती कोरोनाची लागण झाल्यानंतर महापालिकेने दिलेल्या बेडवर भरती करण्यात आलं. महापालिकेने दिलेल्या बेडच्या नियमानुसार या रूग्णाकडून कुठलेही पैसे न घेता उपचार करणं रूग्णालयावर बंधनकारक आहे. तसा करार रूग्णालयासोबत महापालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र, विलास गोणभरे यांच्या मुलाला रोज किमान पाच हजार रूपयांची औषधे आणि सर्जिकल मटेरियल घेतल्याचं आणि त्याचं बिल गुगल पे वरून भरण्याचे निरोप हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आला. त्यानुसार बिलाची रक्कम गुगल पेद्वारे भरण्यातही आले. मात्र, नगरसेवक वसंत मोरे यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी या प्रकाराची शहानिशा केल्यानंतर हॉस्पिटलने खरेदी करायला लावलेली औषधे रूग्णासाठी वापरलीच नाही किंवा कमी प्रमाणात वापरल्याच त्यांच्या लक्षात आलं. त्याबाबत त्यांनी रूग्णाला फोनवरून विचारपूस करून खात्री ही केली. केवळ पीपीई किट आणि इंजेक्शनचा खर्च रूग्णाकडून आकारता येणार असल्याचं करारात नमूद करण्यात आलं आहे. हे रूग्णालय फसवणूक करून औषधेच्या माध्यमातून पैसे उकळत असल्याचं उघड झालं आहे.

या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाला महापालिकेचे अधिकारी बोलवून जाब विचारल्यानंतर हॉस्पिटलनं चूक मान्य करत तातडीने पैसे परत देण्यास मान्य केल्याचं नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितलं आहे. खासगी रूग्णालयात महापालिकेने पाठवलेले अनेक रूग्ण उपचार घेत आहेत. ज्यांच्या बिलाचे पैसे महापालिका भरणार आहे, मात्र, हॉस्पिटलकडून दिल्या जाणाऱ्या माहितीची खातरजमा करण्याची कुठलीच यंत्रणा नसल्याने खासगी हॉस्पिटल रूग्ण आणि मनपा दोघांकडून पैसे उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!