Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaWorldUpdate : कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे जगभरातील “हे” प्रमाण आपणास माहित आहे काय ?

Spread the love

जगभरात जवळपास २०० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावला आहे. जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे प्राण गमावलेल्यांची संख्या सात लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिकोसह अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे. मागील काही दिवसांपासून जगभरात सरासरी १५ सेकंदाला एका कोरोनाबाधिताचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. भारतात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. बुधवारी भारताने करोनाबाधितांच्या संख्येने १९ लाखांचा आकडा ओलांडला आहे. भारतात १२ लाख ८२ लाख करोनाबाधितांनी करोनाच्या संसर्गावर मात केली आहे. भारतात करोनाबाधितांची संख्या १९ लाख ८ हजार झाली असून मृतांची संख्या ४० हजारांच्या घरात पोहचली आहे. नवीन करोनाबाधितांची संख्या मागील सात दिवसांपासून ५० हजारांच्या घरात आहे.

अमेरिका हा सध्या करोना संसर्गाचे मुख्य केंद्र झाले आहे. कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडासह अन्य राज्यांमध्ये करोना संसर्ग पसरत आहे. एका आकडेवारीनुसार, अमेरिकेत दररोज एक हजार बाधितांचा मृत्यू होत आहे. ब्राझीलमध्ये मागील २४ तासात ५१ हजारांहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर करोनाबाधितांच्या संख्येने २८ लाखांचा आकडा ओलांडला. ब्राझीलमध्ये ११०० जणांचा एका दिवसांत मृत्यू झाला आहे. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मागील दोन आठवड्यात करोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. मागील २४ तासात ५९०० जणांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ दर एका तासात २४७ अथवा १५ सेकंदाला एका करोनाबाधिताचा मृत्यू होत आहे. जगभरात करोनामुळे सात लाखांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, करोनामुळे संसर्गबाधित होणाऱ्यांचे प्रमाण एक कोटी ८७ लाखांहून अधिक झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ११ मार्च रोजी करोनाच्या आजाराला महासाथीचा आजार घोषित केला होता.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी करोना संसर्गाच्या शोधाच्या अनुषंगाने केलेला दौरा नुकताच आटोपला. त्यानंतर आता चीन व जागतिक आरोग्य संघटना करोना संसर्गाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी दोन आठवड्यांच्या या दौऱ्या दरम्यान करोना संसर्गाचे उगमस्थान शोधण्यासाठी सहकार्याबाबत प्राथमिकदृष्ट्या चर्चा केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!