Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaNewsUpdate : तरुणांच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने दिला कोरोनाबाबत हा नवा इशारा….

Spread the love

कोरोना वॅक्सीनसाठी जगात सर्वत्र युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असले तरी हे वॅक्सीन येण्यासाठी 2021 वर्ष उजाडणार असून परिणामी कोरोनासोबत राहण्याची सवय करून घ्यावी लागेल असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं. WHO चे प्रमुख टेड्रॉस अडहॉनम गीब्रीएसुस यांनी ही माहिती दिली. जगभरात सर्वांनाच आता कोरोनासोबत राहायची सवय करून घ्यायला हवी असं ते म्हणाले.  कोरोनामुळे लहान मुलं आणि वृद्धच नाही तर तरुणांनाही मोठा  धोका असल्याचे  आता समोर आले आहे. परिणामी कोरोनामुळे तरुणांचाही मृत्यू होऊ लागल्यानं जागतिक आरोग्य संघटनेनं हा इशारा दिला आहे.

WHO ने म्हटले आहे कि , रोग प्रतिकार क्षमता अंगी असल्याने कोरोनामुळे तरुणांचा मृत्यू होत नाही हा समज चुकीचा आहे. दरम्यान कोरोना हा तरुणांच्या इतर अवयवांवरही परिणाम करतो हि वस्तुस्थिती लक्षातघेऊन प्रत्येकाला स्वतः सावधगिरी बाळगून कोरोनासोबत राहायला शिकायला हवं आणि आपल्यासोबत दुसऱ्यांची काळजी घ्यायला हवी.  बऱ्याच देशांमध्ये कोरोनाचं  संक्रमण सामान्य मानलं जातं. तरीही तरुणांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी जास्त काळजी घ्यायला हवी. तरुणांनी सोशल डिस्टन्स, मास्क वापरणं, सॅनिटायझरचा वापर योग्य पद्धतीनं करायला हवा. अमेरिका, ब्राझील, भारत, दक्षिण आफ्रिका आणि कोलंबियामधील बिघडत्या परिस्थितीबद्दलही WHO ने चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 लाखावर पोहोचला आहे. त्यापैकी जवळपास 5 लाख 45 हजार 318 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 24 तासात कोरोनामुळे 779 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशात आतापर्यंत मृतांचा आकडा 35 हजार 747 वर पोहोचला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!