Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात राज्यात ११ हजार रुग्णांची नोंद तर २६६ जणांचा मृत्यू

Spread the love

दिवसेंदिवस राज्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढत असून, आज ११ हजार १४७ इतक्या उच्चांकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ११ हजार ७१९ वर पोहोचली आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात २६६ जणांचा मृत्यू झाल्यानं बळींची एकूण संख्या १४ हजार ७२९ झाली आहे. मुंबईतील कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर आता पुण्यात करोनानं थैमान घातलं आहे. राज्याच्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपैकी ४८ हजार ८१५ अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात ३१ हजार ९२३ अॅक्टिव्ह रुग्ण तर, २० हजार १५८ रुग्ण मुंबईत आहेत.

राज्यात करोनाचा विळखा अधिकाअधिक घट्ट बसत आहे. राज्यात एकीकडे रिकव्हरी रेट ६० टक्क्यांवर पोहोचल्यानं काही प्रमाणात दिलासा मिळत असल्यानं एककडे दिवसभरात ११ हजारांवर रुग्ण आढळल्यानं आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ आहे. आज आठ हजार ८६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं एकूण २ लाख ४८ हजार ६१५ रुग्ण करोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. त्यामुळं राज्याचा रिकव्हरी रेट एक टक्क्यानं वाढून ६० टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात सध्या १ लाख ४८ हजार १५० अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील विविध रुग्णालयांत ते सध्या उपचार घेत आहेत. तसंच, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ चाचण्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या ९ लाख ०४ हजार १४१ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ४० हजार ५४६ व्यक्ती संस्थांत्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय झालेले मृत्यू

नोंद झालेले २६६ मृत्यू यांचा तपशील असा: मुंबई मनपा-१२०८ (५३), ठाणे- २६६, ठाणे मनपा-२४२ (६),नवी मुंबई मनपा-३७३ (१०), कल्याण डोंबिवली मनपा-३५७ (६),उल्हासनगर मनपा-७२ (४), भिवंडी निजामपूर मनपा-२७ , मीरा भाईंदर मनपा-१६४ (४),पालघर-१०८, वसई-विरार मनपा-२६६ (५), रायगड-२४५ (६), पनवेल मनपा-१७१ (२), नाशिक-१७० (२), नाशिक मनपा-३१९ (७), मालेगाव मनपा-१४, अहमदनगर-२५४ (४),अहमदनगर मनपा-२१० (३), धुळे-३३, धुळे मनपा-३४ (१), जळगाव-२५६ (७), जळगाव मनपा-११९ (१), नंदूरबार-१५ (१), पुणे- ४३३ (२१), पुणे मनपा-१८८९ (५२), पिंपरी चिंचवड मनपा-९८७ (१०), सोलापूर-२२७ (५), सोलापूर मनपा-९७ (५), सातारा-२०८ (१०), कोल्हापूर-३४८ (१), कोल्हापूर मनपा-४७ (२), सांगली-८६ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१६६ (१), सिंधुदूर्ग-२, रत्नागिरी-२५ (५), औरंगाबाद-२५२, औरंगाबाद मनपा-१६६ (६), जालना-५०, हिंगोली-१०, परभणी-६४, परभणी मनपा-४ (१), लातूर-९२ (२), लातूर मनपा-३९ (२), उस्मानाबाद-९९ (३), बीड-६१, नांदेड-७४ (७), नांदेड मनपा-७७ (४), अकोला-५३, अकोला मनपा-१३, अमरावती-२, अमरावती मनपा-१४८ (१), यवतमाळ-२८, बुलढाणा-२५ (१), वाशिम-९ (१), नागपूर-१४७ , नागपूर मनपा-१९५ (२), वर्धा-१५, भंडारा-२४, गोंदिया-१२, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-५, गडचिरोली-१४, इतर राज्य १४.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!