Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalNewsUpdate : नोकरी हिसकावली , साठवलेले पैसेही हडपले , तरीही स्वप्न दाखवत आहेत !! राहुल गांधी यांचे मोदींवर टीकास्त्र…

Spread the love

कॉंग्रेस नेते राहुल गांधी  यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. नोकरी हिसकावून घेतली आणि करोनाचा प्रादुर्भावही रोखू शकले नाहीत. परंतु आता ते मोठी स्वप्नं दाखवत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी ट्विट केले. ‘आपण नोकरी हिसकावून घेतली, साठवलेले पैसेही हडपले, करोनाचा प्रादुर्भावही रोखू शकले नाहीत. तरीही पंतप्रधान मोदी विलक्षण खोटी स्वप्नं दाखवत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.

कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांनी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) पीएफकडून एकूण ३०,००० कोटी रुपये काढून घेतल्याच्या वृत्ताचा संदर्भ देताना राहुल यांनी ही प्रतिक्रिया दिली. कोरोना संकटात लॉकडाउनमुळे मोठ्या संख्येने नागरिक बेरोजगार झाले आहेत. लाखो नागरिकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) नागरिकांना पीएफचा काही भाग अॅडव्हान्सध्ये घेण्याची परवानगी दिली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, ‘एप्रिल ते जुलै या कालावधीत सुमारे ८० लाख कर्मचाऱ्यांनी ईपीएफओकडून ३०,००० कोटी रुपये काढले आहेत. ईपीएफओ सुमारे १० लाख कोटींच्या निधीचे व्यवस्थापन करते. या सुमारे ६ कोटी कर्मचारी ईपीएफओमध्ये आपला पीएफ जमा करतात.

दरम्यान यापूर्वी राहुल यांनी आणखी एका ट्विटद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी ट्वीट केले. पंतप्रधान मोदींनी जाणीवपूर्वक कर्जबुडव्यांना वाचवण्यासाठी काम केले, असा आरोप राहुल गांधींनी केला. आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांचे नुकतेच एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. जे कर्ज परतफेड करीत नाहीत त्यांच्यावर मोदी सरकार नरम होते आणि आरबीआयलाही नरम राहण्याची सूचना केली होती, असं उर्जित पटेलन यांनी पुस्तकात म्हटलं आहे. यावरून राहुल गांधींनी केंद्राला घेरलं. उर्जित पटेल हे बँकिंग सिस्टममधील साफसफाई करण्यात गुंतले होते. परंतु, यामुळे त्यांची नोकरी गेली. कारण कर्जफेड न करणाऱ्यांवर पंतप्रधान मोदी कारवाई करू इच्छित नव्हते, असा आरोपही राहुल गांधींनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!