Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaMarketUpdate : भारतीय बाजारपेठेत सोन्या -चांदीच्या दरात विक्रमी वाढ , जाणून घ्या आजचे भाव….

Advertisements
Advertisements
Spread the love

देशातील कमॉडिटी बाजारात आज सोन्याच्या किमतीत १ टक्का वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा भाव ५००१० रुपयांवर गेला. चांदीच्या भावात ४ टक्के वाढ झाली असून चांदीचा दर एक किलोला ५९६३५ रुपये झाला आहे. मंगळवारी सोने ५०० रुपयांनी महागले होते. तर चांदीमध्ये तब्बल ३४०० रुपयांची वाढ झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सोने आणि चांदीने नवा रेकॉर्ड केला आहे. स्पॉट गोल्ड १८५७.८६ डॉलर प्रती औंस इतका वाढला आहे. यापूर्वी सप्टेंबर २०११ मध्ये सोने १८६५.३५ डॉलर प्रती औंस इतके रेकॉर्ड स्तरावर गेले होते. मंगळवारी यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव ०.८ टक्क्यांनी वाढून १८५८.२० डॉलर प्रती औंस इतका झाला होता. चांदीचा भाव २१.७० डॉलर प्रती औंस झाला आहे.

Advertisements

दरम्यान कोरोनावरील लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जगभरात सकारात्मक वातावरण आहे. त्यातच करोनामुळे झालेल आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी काही केंद्रीय बँकांकडून नव्याने पॅकेज घोषीत केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमॉडिटी बाजारात तेजी निर्माण झाल्याचे विश्लेषकांनी सांगितले. सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये झपाट्याने भाववाढ झाली आहे. करोना संकट वाढत असले तरी अनेक देशांनी आता लॉकडाउनची नियमाला शिथिल केली आहे. औद्योगिक क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे चांदीची मागणी वाढली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. नजीकच्या काळात चांदीचा भाव ५५००० ते ५७९०० रुपयांच्या दरम्यान राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

goodreturns.in या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८११० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४९११० रुपये झाला आहे. चांदीचा भाव किलोला ६०४०० रुपये झाला आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत ५०० रुपयांची वाढ झाली.दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४७९१० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४९११० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४८४९० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४९८९० रुपये आहे.आज चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१०० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५१३८० रुपये झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!