Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaWorldUpdate : मोठी बातमी : गेल्या २४ तासात २ लाख ३० हजाराहून अधिक रुग्ण, भारत , अमेरिका ब्राझीलची स्थिती चिंताजनक !!

Spread the love

पूर्वीसारखे दिवस पुन्हा येतील अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे : टेड्रोस अ‍धॅनम

गेल्या २४ तासांत जगभरात सुमारे दोन लाख ३० हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळत आहेत. मागील काही दिवसांपासून सरासरी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळत आहेत. जिनिव्हातील पत्रकार परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अ‍धॅनम घेब्रेयेसस यांनी म्हटले की, कोरोना हा अजूनही जगभरातील मानवासमोरील क्रमांक एकचा शत्रू आहे. येणाऱ्या दिवसांत पूर्वीसारखे दिवस पुन्हा येतील अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. काही देशांकडून कोरोनाच्या संसर्गाला रोखण्याचे प्रयत्न होत आहेत आणि त्यात ते यशस्वीदेखील होत आहेत. मात्र, युरोप आणि आशियातील काही देशांकडून काही चुकीची पावले उचलली जात आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी परिस्थिती आणखी चिंताजनक होत असल्याचाही इशारा त्यांनी दिला.

गेल्या  पाच महिन्यांपासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनामुळे आता परिस्थिती आणखी चिंताजनक होत चालली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. काही देशांच्या नेत्यांनी कोरोनाच्या धोक्याकडे गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे परिस्थिती आणखी धोकादायक झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अ‍धॅनम घेब्रेयेसस यांनी म्हटले. करोनाच्या संसर्गावर मात करता येऊ शकते. मात्र, त्यासाठी अतिशय सावधपणे पावले टाकून निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. करोना संसर्ग टाळण्यासाठी जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले. अमेरिका, ब्राझील आणि भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे.

दरम्यान, गेल्या रविवारी अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद झाली होती . आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका दिवसात फ्लोरिडामध्ये १५ हजार २९९ नवे रुग्ण आढळले असून, ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फ्लोरिडात इतर राज्यांच्या तुलनेत सरासरी मृत्यूदरात गेल्या काही दिवसांपासून सलग वाढ होत आहे. अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून एका राज्यात एकाच दिवसात आढळलेली फ्लोरिडातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यापूर्वी बुधवारी कॅलिफोर्नियात सर्वाधिक ११ हजार ६९४ रुग्ण आढळले होते. तर, न्यूयॉर्कमध्ये १५ एप्रिल रोजी ११ हजार ५७१ रुग्ण आढळले होते. फ्लोरिडामध्ये गेल्या आठवड्यात ५१४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच, येथील कोरोनामृत्यूची सरासरी संख्या ही दिवसाला ७३ इतकी आहे. तीन आठवड्यांपूर्वी सरासरी मृत्यूचे प्रमाण दिवसाला ३० इतके होते. त्यात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. फ्लोरिडात आतापर्यंत चार हजार ३४६ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला असून, एकूण बाधितांची संख्या २,६९,८११ इतकी आहे. फ्लोरिडामध्ये गेल्या महिन्यांपासून चाचण्यांची संख्या दुप्पट करण्यात आल्याने दिवसाला २५ हजारांऐवजी जवळपास ५० हजार चाचण्या करण्यात येत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!