मोठी बातमी : मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयातील वैद्यकीय प्रवेश याचिकेवर अंतिम सुनावणी १५ जुलैला …

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यातील मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुख्य याचिकेसोबत वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश आरक्षणाच्या मुद्यावरही  आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशाबाबत अंतिम सुनावणी येत्या बुधवारी म्हणजे १५  जुलै रोजी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून  सांगण्यात आले आहे. ‘या काळात तात्काळ तारखेचा आग्रह धरणे योग्य ठरणार नाही. अंतरिम आदेशांवर विचार करण्यासाठी आम्ही या सर्व याचिकांची यादी करू,’ असे  न्यायमूर्ती राव म्हणाले यांनी म्हटले  आहे. त्यामुळे 15 जुलैला कोर्ट काय निर्णय देतं, हे पाहावं लागेल.

Advertisements

गेल्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशात मराठा आरक्षणाचा लाभ घेत झालेल्या प्रवेशावर स्थगिती देण्यास नकार दिला होता, अशी माहिती सुप्रीम कोर्टातील वकील सचिन पाटील यांनी दिली होती. सोबतच कोर्टाने मुख्य याचिकेसोबत ही याचिका संलग्नित करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी दरम्यान काय नवीन आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. दरम्यान मराठा आरक्षण वैध ठरवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने जुलै 2019 मध्ये नकार दिला होता. न्यायालयाच्या या आदेशामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला असला तरी आरक्षण देण्याचा कायदा 30 नोव्हेंबर 2018 मध्ये लागू झाला असल्याने त्याची अंमलबजावणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने करता येणार नसल्याचेही सांगितले होते.

Advertisements
Advertisements

दरम्यान मराठा आरक्षणाबाबत गायकवाड समितीचा अहवाल स्वीकारत भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने शैक्षणिक तसेच सरकारी नोकरभरतीमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने 27 जून 2019 ला दिला होता. मात्र, 16 टक्के आरक्षणाऐवजी शिक्षण क्षेत्रात 12 टक्के, तर सरकारी नोकऱ्यांमध्ये 13 टक्के आरक्षण देण्यात यावे, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता.

आपलं सरकार