Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : उद्यापासून पर्यटकांच्या सेवेसाठी गोवा सज्ज

Spread the love

भारतीयांपासून परदेशी नागरिकांचं आवडतं पर्यटनाचं ठिकाण गोवा उद्यापासून पर्यटकांसाठी खुलं होणार आहे. गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांनी बुधवारी याबाबत घोषणा केली. यावेळी ते म्हणाले किनारपट्टीवरील भाग पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. गोव्यातील 250 हॉटेलांनी यासाठी तयारी दर्शवली आहे. मात्र यासाठी 48 तासांमध्ये कोरोनाची चाचणी करणे आवश्यक असून अथवा गोव्यात त्यांना कोरोनाची चाचणी करणं अनिवार्य असेल.

गोव्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी गोवा सरकारने उद्यापासून पर्यटन खुले  करण्याची निर्णय घेतला आहे . अर्थात यासाठी काही अटी असणार आहेत. पर्यटकांना अगोदरच हॉटेल बुकिंग करावे लागणार आहे आणि पर्यटकांना कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट सादर करावे लागेल किंवा गोव्यात आल्यानंतर कोरोना टेस्ट करावी लागेल . आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पर्यटकांना इतरत्र फिरू देण्यात येणार आहे. सध्या गोव्यात पाऊस सुरू आहे. 20 मार्च पासून गोव्यात पर्यटन बंद आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाचे नुकसान होत होते. अशा परिस्थितीत स्थानिक व्यावसायिकांनी हॉटेल सुरू करण्याची मागणी केली होती. यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे अर्थात याला पर्यटकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे मात्र पहावे लागेल .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!