Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली मोठी बातमी : कोरोनावर औषध काढल्याचा दावा करणारे बाबा रामदेव यांच्यसह चार जणांविरुद्ध अपप्रचाराचा गुन्हा…

Spread the love

पतंजली आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनावर पहिले  औषध काढल्याचा दावा केल्यानंतर बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी पतंजली विरोधात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान यासंबंधी बाबा रामदेव आणि इतर 4 जणांवर राजस्थानच्या जयपूर इथे गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. कोरोनावर औषध म्हणून कोरोनिलचा अपप्रचार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या एफआयआरमध्ये योगगुरु रामदेव बाबा आणि बालकृष्ण यांच्याबरोबरच एनआयएमएसचे अध्यक्ष अनुराग वार्ष्णेय, डॉ. बलबीरसिंग तोमर आणि संचालक डॉ. अनुराग तोमर यांच्यावर आरोप केले गेले आहेत.

कोरोनाचं औषध म्हणून कोरोनिलबद्दल भ्रामक प्रचार केल्याच्या आरोपाखाली जयपूरमध्ये ज्या पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात रामदेव आणि पतंजलीचे बालकृष्ण यांचीही नावं आहेत. शुक्रवारी जयपूरमधल्या ज्योतिनगर पोलीस स्टेशनमध्ये ही एफआयआर दाखल करण्यात आली होती. दरम्यान या औषधामुळे योगगुरू रामदेव बाबा यांच्यासमोर अडचणी अधिकच वाढत चालल्या आहेत. आधी केंद्र आणि राज्य सरकारने या औषधावरून प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर पतंजलीने ज्या डॉक्टरांच्या सहयोगाने आपण जयपूरच्या निम्स (NIMS) रुग्णालयात या औषधाचं क्लिनिक ट्रायल केल्याचे सांगितले होते त्यांनी मात्र असे कुठलेही क्लिनिक ट्रायल झाले नसल्याचे सांगितले आहे.

आपल्या रुग्णालयात कोरोनिल औषधाचं ट्रायल झालंच नाही तर आयुर्वेदिक औषधं फक्त कोरोना रुग्णांना देण्यात आली, असं निम्सचे चेअरमन बीएस तोमर (BS TOMAR) यांनी सांगितलं. बीएस तोमर म्हणाले, “आपल्या रुग्णालयात कोरोनाच्या कोणत्याही औषधाचं ट्रायल झालं नाही. आम्ही कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अवश्वगंधा, तुळस आणि गुळवेल दिले  होते. बाबा रामदेव यांनी याला कोरोनाचा 100 टक्के उपचार करणारे  औषध कसं म्हटलं ? याबाबत मी आता काही सांगू शकत नाही. याबाबत फक्त रामदेव बाबाच सांगू शकतात” त्यामुळे कोरोनाचं हे औषध सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे.

आयुष मंत्रालयाने कोरोनिल लाँच होताच  पतंजलीच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले. या औषधाबाबत सविस्तर माहिती देण्यास सांगितलं. तोपर्यंत औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले होते. यानंतर उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागानेही पतंजलीला नोटिस बजावली. खोकला-तापच्या औषधासाठी परवाना दिला होता, कोरोना औषधासाठी परवाना कसा मिळाला, याची विचारणा केली. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात याचिका करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!