Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ऑनलाईन शिक्षणासाठी “गुगल क्लासरूम”च्या वापराची योजना

Spread the love

सध्या राज्यातील शाळा प्रवेशाची चर्चा सुरु असून या विषयावर बोलताना राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी म्हटले आहे कि , महाराष्ट्रात यापूर्वी १५ जून पासून शाळा सुरू करण्यावर विचार सुरू होता. परंतु आता शाळा सुरू करण्याऐवजी केवळ अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. दरम्यान, जुलै महिन्यापासून वर्ग सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात १५ जून आणि २६ जून रोजी (विदर्भ क्षेत्रासाठी) तसंच ग्रीन झोनमध्येही शाळा सुरू होणार नाही.

दरम्यान गेल्या रविवारी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीनं शाळा जून महिन्यापासून सुरू होणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच राज्यातील ऑनलाइन शिक्षण पद्धतीवरही भर देण्याची गरज असल्याचं मंत्र्यांनीदेखील सांगितलं होतं. “सध्या गुगल क्लासरूम वापरली जाऊ शकते. तसंच येत्या काळात स्वतंत्र संगणक आधारित प्रणाली विकसित केली जावी,” असंही ते म्हणाले होते.

या बाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी पुढे म्हटले आहे कि , “शालेय शिक्षण विभागाला विनामूल्य ऑनलाइन वर्गांची सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी गुगल तयार आहे. शिक्षण विभागाने टप्प्याटप्प्याने शाळा पुन्हा सुरू करण्याची योजना तयार केली आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उत्सवाच्या सुट्ट्या कमी करण्याचा आणि शैक्षणिक वर्षाचा कालावधी मेपर्यंत वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!