Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#MaharashtraNewsUpdate : समजून घ्या महाराष्ट्रात काय सुरु राहील आणि काय बंद ?

Spread the love

केंद्र सरकारने काल तीन टप्प्यातील अनलॉकची मार्गदर्शक तत्वे जाहीर केल्यानंतर आज राज्य सरकारकडूनही अनलॉकबाबतची नियमावली जाहीर केली. त्यानुसार केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे रात्रो ९ ते पहाटे ५ पर्यत कर्फ्यु कायम राहणार आहे. मात्र मुंबई, पुणे येथील वाढती चिंताजनक परिस्थिती पाहता केंद्रांच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
केंद्राने जारी केलेल्या सवलती या ८ जूनपासून लागू होणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या सवलती या ३ जूनपासून अर्थात केंद्रापेक्षा ५ दिवस आधीच आपल्याकडे सवलतीतील लॉकडाऊन सुरु होणार आहे.
नव्या बदलेल्या नियमानुसार-कंटोन्मेंट विभाग जाहीर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांशी सल्लामसलत करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या विभागामध्ये फक्त अत्यावश्यक आणि जीवनाश्वक गोष्टींचीच दुकाने सुरु राहणार आहेत.
या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्याने सवलती देणार-
राज्यातील रेड झोन म्हणून ओळखले जाणारे, मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, सोलापूर, औरंगाबाद, मालेगांव, नाशिक, धुळे, जळगांव, अकोला, अमरावती आणि नागपूर आदी भागात टप्प्याटप्याने सवलती देण्यात येणार आहे.
३ जूनपासून मिळणाऱ्या सवलती-
शाररीक तंदरूस्तीसाठी रनिंग, जॉगिंग, सायकलिंग, मॉर्निंग वॉक करण्यासाठी मोकळी मैदाने, खेळाची मैदाने, समुद्र किनारे, खाजगी खेळाची मैदाने आदी गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी पहाटे ५ ते सकाळी ७ ही मर्यादीत वेळ देण्यात आली आहे.
ग्रुप अॅकटीव्हीटीला परवानगी नाकारण्यात आली आहे.
गरजे पुरते घराच्या बाहेर राहण्यास परवानगी देत प्रमाणबाहेर रस्त्यावर राहण्यास निर्बध घालण्यात आले आहे.
प्लंबर, इलेक्ट्रीशयन , पेस्ट कंट्रोल, टेक्निशियन आदी गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे.
सरकारी कार्यालये १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु होणार आहेत.
२ रा अनलॉकचा टप्पा ५ जुन पासून-
सर्व बाजारपेठा दुकाने आदी गोष्टी सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र मॉल्स आणि कॉम्पेल्स आदींना परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र सुरु होणारी दुकाने पी १, पी२ पध्दतीने सुरु करता येणार आहेत. मात्र ही दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत.
कपड्याच्या दुकानातील ट्रायल रूम्स वापरण्यास परवानगी नाकारली आहे. तसेच कपडे बदलून देणे- किंवा एकदा घेतलेला माल परत बदलून देण्याची पॉलिसी या कालावधीत बंद करण्यात आली आहे.
जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जवळच्या ठिकाणी जाण्यास परवानगी आहे. मात्र त्यासाठी लांब जाण्यास परवानगी नाकारण्यात आली.
शाररीक अंतर पाळण्याच्या नियमाचे उल्लघंन झाल्याचे आढळून आले तर दिलेल्या सवलती तात्काळ बंद करण्यात येणार आहेत.
रिक्षा, चारचाकी वाहनात, टॅक्सी, कॅब वाहनाने प्रवास करायचा असेल तर ड्रायव्हरसह २ व्यक्तींना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर दुचाकीवर फक्त एकाला परवानगी देण्यात येत आहे.
तीसरा अनलॉक-८ जून पासून:
सर्व खाजगी कार्यालये १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर उर्वरित कर्मचारी घरीबसून काम करण्यास परवानगी देण्यात आली.
रेड झोनमध्ये आणि कंटोमेंन्ट एरिया सोडून चारचाकी, तीन चाकी वाहनाने प्रवास करण्यासाठी ड्रायव्हर सह २ व्यक्तींना तर दुचाकीवरून फक्त एकास प्रवास करण्यास मुभा देण्यात आली.
५० टक्के क्षमतेसह जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु होणार. शाररीक अंतर नियमाचे पाळून ही सेवा सुरु होणार.
आंतरजिल्हा प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी वेगळे निर्देश जारी करणार.
या भागातही सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यत मॉल्स आणि कॉम्पेक्स वगळता सर्व बाजारपेठा सुरु राहणार आहेत.
या गोष्टीं बंद राहणार
शाळा, महाविद्यालये, कोचिंग सेंटर, इस्टीट्युट, प्रषिक्षण केंद्रे आदी गोष्टी बंद राहणार.
आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा बंद.
मेट्रो रेल्वे सेवा बंद.
रेल्वे प्रवाशी सेवा आणि देशातंर्गत विमान सेवा या वेगळ्या आदेशान्वये कार्यान्वित राहणार.
चित्रपटगृहे, जिमॅनिशियम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, पार्क, बार, ऑडिटोरियम, राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम जाहीर करण्यास बंदी.
धार्मिक स्थळे, न्हाव्याची दुकाने, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्पीटॅलीटी सव्हिसेस बंद राहणार.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!