Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#MaharashtraCoronaVirusUpdate : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारावर , जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची काय आहे स्थिती….?

Spread the love

राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असतानाही  कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाबाधिताची संख्या नियंत्रणात येत नसल्याने चिंता वाढली आहे. धक्कादायक म्हणजे राज्यात शनिवारी ३६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७९० एकूण नवीन रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे.   तसेच राज्यात आत्तापर्यंत दोन हजार रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. मुंबईत २७, पुण्यात ३, अमरावतीत ३, वसई-विरार १, औरंगाबाद-१ मृत्यू झाला आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील एकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये २८ पुरुष तर ८ महिला आहेत. कोरोनामुळे राज्यात मृतांची एकूण संख्या ५२१वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यानं प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता १२ हजार ३२१ झाली आहे.

दरम्यान राज्यासाठी थोडीशी दिलासा देणारी बाब म्हणजे आज आणखी १२१ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून आतापर्यंत राज्यात २००० रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यातील एकूण ९७७५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ६१ हजार ९२ नमुन्यांपैकी १ लाख ४८ हजार २४८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत तर १२ हजार २९६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ७४ हजार ९३३ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १२ हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत आज ५४७ नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोणाच्या एकूण रुग्णांची संख्या ८१७२ वर पहोचली आहे. आज कोरोणामुळे २७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण ३२२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३७ जण कोरोनमुक्त झाले असून आजवर १७०८ पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. पुण्यात दिवसभरात १०७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळली असून चार करोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू आहे. डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण ४१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेले ५३ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ६७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, पुण्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १७१८आहेत. आतापर्यंत एकूण ९५ जण कोरोनामुळे दगावली आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ८३५ (३२२)

ठाणे मंडळ

ठाणे: ५७ (२)

ठाणे मनपा: ४६७ (७)

नवी मुंबई मनपा: २०४ (३)

कल्याण डोंबिवली मनपा: १९५ (३)

उल्हासनगर मनपा: ४

भिवंडी निजामपूर मनपा: २० (१)

मीरा भाईंदर मनपा: १३९ (२)

पालघर: ४४ (१)

वसई विरार मनपा: १४४ (४)

रायगड: २७ (१)

पनवेल मनपा: ४९ (२)

नाशिक मंडळ

नाशिक: ८

नाशिक मनपा: ३५

मालेगाव मनपा: २१९ (१२)

अहमदनगर: २६ (२)

अहमदनगर मनपा: १६

धुळे: ८ (२)

धुळे मनपा: १९ (१)

जळगाव: ३४ (११)

जळगाव मनपा: १२ (१)

नंदूरबार: १२ (१)

पुणे मंडळ

पुणे:८० (४)

पुणे मनपा: ११८७ (९५)

पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)

सोलापूर: ७

सोलापूर मनपा: १०८ (६)

सातारा: ३६ (२)

कोल्हापूर मंडळ

कोल्हापूर: १०

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: २९

सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)

सिंधुदुर्ग: ३ (१)

रत्नागिरी: १० (१)

औरंगाबाद मंडळ

औरंगाबाद: ५

औरंगाबाद मनपा: २४० (९)

जालना: ८

हिंगोली: ३७

परभणी: १ (१)

परभणी मनपा: २

लातूर मंडळ

लातूर: १२ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: ४

अकोला मंडळ

अकोला: १२ (१)

अकोला मनपा: ३७

अमरावती: ३ (१)

अमरावती मनपा: २८ (९)

यवतमाळ: ७९

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: २

नागपूर मंडळ

नागपूर: ६

नागपूर मनपा: १४० (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

इतर राज्ये: २७ (४)

एकूण: १२ हजार ३२१ (५२१)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!