Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….

Spread the love

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पुणे शहरातील ससून रुग्णालयात आज आणखी तिघांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. तिघांचे वय हे साठ वर्षांपेक्षा अधिक होते. त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. पुण्यातील मृतांची संख्या आता आठवर पोहोचली आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आज आणखी १० रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ८९१ वर पोहोचला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान औरंगाबाद शहरात आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एकूण १२ झाली आहे. या सर्व रुग्णांवर उपचार चालू आहेत. आतापर्यंत एकूण १४ जणांना कोरोनाची लागण झाली होती त्यापैकी एकाच मृत्यू झाला तर एक रुग्ण उपचारानंतर बरा होऊन स्वतःच्या घरी परतला आहे. आज पॉझिटिव्ह आलेले तीन रुग्ण आधीच्या रुग्णांचे नातेवाईक आहेत.

आज सकाळपर्यंत राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा २३ ने वाढला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक १०  रुग्ण वाढले आहे. तर पुण्यात ४ रुग्ण आढळले आहे. तर सांगली १, बुलडाणा १, ठाणे १ आणि नागपूर २  आढळले आहे.  राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना संदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. तसंच कॅबिनेट मंत्र्यांसोबत त चर्चा करणार आहेत. काही कॅबिनेट मंत्री मुंबई बाहेर आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. दरम्यान, मुंबईतील धारावीमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. धारावीमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. धारावीमध्ये आज नव्याने कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असून हे दोन्ही रुग्ण धारावीतील बलिगा नगरमधील असल्याची माहिती आहे. याधी जी महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती, तिच्या 80 वर्षांचे वडील आणि 49 वर्षांचा भाऊ या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, धारावीतील करोना रुग्णांची संख्या ७ वर पोहोचली आहे. त्यापैकी बलिगा नगरमध्ये चार, आणि वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर आणि मदिना नगरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. दरम्यान, राज्यात आज पुन्हा २३ रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांचा आकडा ८९१वर पोहोचला असून मुंबईतील करोना रुग्णांचा आकडा ५२६वर गेला आहे. आज आढळलेल्या २३ नव्या रुग्णांपैकी मुंबईत १०, पुण्यात ४, नगरमध्ये ३, नागपूर आणि बुलडाण्यात प्रत्येकी दोन व सांगलीत एक रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

उपलब्ध माहितीनुसार धारावीच्या बलिगा नगरमध्ये हे दोन रुग्ण आढळले आहेत. एकाच घरातील हे दोघेही रुग्ण आहे. एका ४९ वर्षीय व्यक्तीला आणि त्याच्या ८० वर्षीय वडिलांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या कुटुंबाचं घर सील करण्यात आलं आहे. त्याशिवाय या संपूर्ण बलिगा नगरही सील करण्यात आलं आहे. बलिगानगरमधील करोना रुग्णांची संख्या चारवर पोहोचली असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. आता हे दोन नवे रुग्ण आढळल्याने बलिगा नगरमध्ये खळबळ उडाली आहे. हे दोन नवे रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याची माहिती घेतली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!