Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : धक्कादायक : औरंगाबादेत आढळले १० रुग्ण, एकाचा मृत्यू , मराठवाड्यातील रुग्णांची संख्या १९

Spread the love

औरंगाबाद शहरात एकूण १० रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी एकाच मृत्यू झाला. यामध्ये एन ४ मध्ये ३, सातारा परिसर १, देवळाई १, जलाल कॉलनी २, अरिफ कॉलनी १ आणि रोशन गेट १ अशा ९ रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान महापौर नंदकुमार घोडेले यांनी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. ज्या भागात रुग्ण आढळले आहेत त्या रुग्णांच्या संपर्कातील लोक आणि त्या भागातील लोकांची तपासणी करण्याचे आदेशही जिल्हा आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत.


मराठवाड्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता वाढत असून कोरोनामुळे पहिला बळी औरंगाबाद शहरात गेला असल्याचे वृत्त आहे . मयत रुग्ण हा ५८ वर्षांचा असून तो औरंगाबादच्या बीड बाय पास पास परिसरातील रहिवासी होता. या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असला तरी त्याला अनेक आजार होते. कार्डियाक अटॅकमुळे त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. या शिवाय आज नवीन पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८ झाली असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. मयत रुग्णाला दि . ३ एप्रिल रोजी  घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री ८ वाजता त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यात त्याला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आज दुपारी साडेबारा वाजता उपचार सुरू असताना या व्यक्तीचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. या व्यक्तीला मधूमेह आणि हृदयविकाराचाही त्रास होता, असं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. नव्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील १९ रुग्णांमध्ये औरंगाबाद ७ हिंगोली १, लातूर ८ आणि उस्मानाबादमधील ३ रुग्णांचा समावेश आहे तर मृतांची संख्या एक आहे.

दरम्यान घाटी रुग्णालयात येण्यापूर्वी ही व्यक्ती खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. ही व्यक्ती अॅडमिट असलेल्या कालावधीत रुग्णालयात आलेल्या रुग्णांची आणि रुग्णालयातील डॉक्टरसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनीही तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच ही व्यक्ती राहत असलेला परिसरही  सील करण्यात आला असून त्याच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. हा रुग्ण ज्यांच्या संपर्कात आला होता, त्यांचा शोध घेतला जात असून त्याच्या संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे.

औरंगाबादमध्ये आज पाच जणांना करोनाची लागण झाली असून औरंगाबादमधील रुग्णांची संख्या आता सातवर गेली आहे. हे पाचही जण औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. करोनाची लागण झालेल्यांमध्ये दोन वर्षाच्या आणि ७ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या चालकालाही करोनाची लागण झाल्याने औरंगाबादच्या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातवरण निर्माण झालं आहे.

दरम्यान  जिल्हा रुग्णालयात दाखल दोन करोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे शनिवारी रात्री उशिरा कळविण्यात आले. त्यात ४५ वर्षीय महिला आणि ३८ वर्षीय पुरुष ( राहणार अनुक्रमे – आरेफ कॉलनी आणि बीड बाय पास) यांचा समावेश आहे. या दोघांत आरेफ कॉलनीतील एका ४५ वर्षीय महिलेचा आणि बीड बायपास परिसरातील एका ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एका खाजगी रुग्णालयात दाखल सात वर्षाची मुलगीही करोना पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच सिडकोत एन-४ परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळल्याने या ठिकाणचा परिसर सील करण्यासाठी पोलीस, प्रशासन घटनास्थळी पोहोचले होते.

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण. उमरगा येथील ४२ वर्षीय रुग्णाचा लाळ नमुना अहवाल आला पॉझिटिव्ह. शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला अहवाल. उमरगा, धानोरी आणि अन्य काही ठिकाणच्या एकूण ५६ जणांचे घेतले होते लाळ नमुने. जिल्ह्यातील करोना रुग्णाची संख्या तीन. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली माहिती.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!