Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : एक नजर : दुपारपर्यंतच्या बातम्या…राज्यातील रुग्णांची संख्या ५४७ तर देशात २९०२, वाढत्या लॉकडाऊनबद्दल काय बोलले आरोग्यमंत्री ?

Spread the love

राज्यात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात ४७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये रात्रभरात २८ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे तर ठाण्यामध्ये कोरोनाचे १५ नवे रुग्ण समोर आले आहेत. अमरावतीमध्ये १, पुण्यात २ तर पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाच्या १ रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या आकड्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान करोनाविरुद्ध लढण्यासाठी राज्याला केंद्र सरकारकडून १६ हजार १०० कोटींचा निधी मिळाला आहे.

देशभर पुकारण्यात आलेला लॉकडाऊन येत्या १४ एप्रिल रोजी संपत असला तरी महाराष्ट्रात हा कालावधी काही आठवड्यांनी वाढवला जाऊ शकतो, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिले आहेत . मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांच्या बाबतीत तसा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान ‘करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. विशेषत: मुंबईत पूर्ण काळजी घेतली जात आहे. मुंबईत करोनाचा संसर्ग रोखणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. महापालिका, पोलीस व आरोग्य विभागाच्या टीम त्यासाठी अहोरात्र झटत आहेत. जवळपास १५० परिसर सील करण्यात आले आहेत. संशयितांना ओळखण्यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहेत,’ असं टोपे म्हणाले. ‘सध्याच्या लॉकडाऊनमुळं हळूहळू संसर्गाचं प्रमाण आणि रुग्णांची संख्या कमी होईल अशी आशा आहे. मात्र, आजघडीला तरी आकडा वाढताना दिततोय. त्यामुळं लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे. अर्थात, हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये लगेचच लॉकडाऊन मागे घेतला जाऊ नये, असं माझं वैयक्तिक मत असल्याचं टोपे म्हणाले. एका न्यूज वेबसाइटशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

देशातील रुग्णांची संख्या २९०२ पर्यंत 

भारताने कोरोनाला रोखण्यासाठी वेळीच सुरक्षित पाऊलं उचलली असतानाही कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. भारतामध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे  ६०१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर आता देशात रुग्णांचा आकडा हा २९०२ वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांचा हा वाढता आकडा खऱंतर नागरिकांची चिंता वाढवणारा आहे. शनिवारी जारी केलेल्या अहवालानुसार, मागच्या २४ तासांमध्ये देशात ६०१ नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. म्हणजेच प्रत्येक दोन मिनिटाला एक व्यक्ती कोरोनाच्या जाळ्यात अडकत आहे. आतापर्यंत भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९०२ पर्यंत वाढली आहे. त्यामध्ये २६५० सक्रिय प्रकरणं तर १८३ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मृतांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. अशी अधिकृत माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये लॉकडाऊनच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. याबाबत परिस्थिती पाहून राज्यांनी आपापल्या पातळीवर निर्णय घ्यावा, अशी सूचना मोदींनी केली होती. मात्र, सर्व निर्बंध एकदम उठवल्यास आतापर्यंतच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाऊ शकते, असंही ज्येष्ठ नेत्यांचं व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!