Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : दुनिया : १० लाखाहून अधिक जणांना लागण, ५३ हजाराचा बळी , २ लाख लोक झाले कोरोना मुक्त !!

Spread the love

संपूर्ण देशात कोरोनाचा कहर चालूच असून चीनमधील वुहान शहरातून उद्भवेला करोनानं जगातील २०४ देशांत आपली पायामुळे रोवली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं करोना व्हायरसला महामारी असे घोषित केलं आहे. या महामारीवर अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलबद्ध नसल्यामुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. जगभरातील देशांनी जारी केलेल्या आकडेवारी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्याआकड्यांच्या आधारावर worldometers.info नं दिलेल्या माहितीनुसार, करोना व्हायरसनं आतापर्यंत ५३ हजार दोनशे ३८ जणांचा बळी घेतला आहे. तर दहा लाख १६ हजार ४१३ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात दोन लाख १३ हजार ३५ जण कोरानामुक्त झाले आहेत.

करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटली, स्पेन आणि अमेरिकेला बसला आहे. आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनंही या रोगाची धास्ती घेतली आहे. अमेरिकेत दोन लाख ४४ हजार ८७७ जणांना करोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत सहा हजांरापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोप या महासाथीमुळे हादरला असून, यापुढील काळ आमच्यासाठी ‘भयानक’ राहील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिला आहे. पृथ्वीच्या निम्म्या भागांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची टाळेबंदी सुरू असतानाही गेल्या २४ तासांत करोना विषाणूने जगभरात हजारो बळी घेतले असून, यात स्पेनमधील नव्या १ हजार बळींचा समावेश आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतही या महासाथीने अनर्थ माजवणे सुरू ठेवले असून, स्पेनने एकाच महिन्यात नोकऱ्या गमावलेल्यांची सर्वाधिक संख्या जाहीर केली आहे, तर अमेरिकाही लवकरच त्या देशातील प्रचंड प्रमाणावर गमावण्यात आलेल्या नोकऱ्या उघड करण्याची अपेक्षा आहे. गेल्या पाच आठवडय़ांत करोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये घातक वेगाने वाढ झाली असून, गेल्या एकाच आठवडय़ात बळींची संख्या दुप्पट झाली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेद्रोस अधानोम घेब्रेसिस यांनी सांगितले.

गेल्या २४ तासांत स्पेनमध्ये करोनामुळे विक्रमी ९५० लोक बळी गेल्यामुळे त्या देशात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०००३ झाली आहे. करोनाबाधितांची संख्या १ लाख १० हजारांपार गेल्याचे स्पेन सरकारने सांगितले. मात्र, करोनाची महासाथ तेथे ‘स्लोडाऊन’ टप्प्यात प्रवेशली असून नव्याने संसर्ग आणि मृत्यू यांचा दर कमी झाला आहे, असे आरोग्यमंत्री साल्वाडोर इल्ला म्हणाले. करोनाचा परिणाम प्रामुख्याने वृद्ध, तसेच पूर्वीच शारीरिक आजार असलेल्यांवर झाला आहे; तथापि तो कुठल्याही वयोगटातील लोकांचे जीव घेऊ शकतो असे अलीकडच्या प्रकरणांवरून अधोरेखित झाले आहे. करोनाच्या मृतांमध्ये फ्रान्समधील १६ वर्षांच्या, बेल्जियममधील १२ वर्षांच्या आणि ब्रिटनमधील १३ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. जगभरात जेवढय़ा लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे, त्यापैकी जवळजवळ एक चतुर्थाश लोक अमेरिकेतील आहेत. गुरुवारी सकाळपर्यंत तेथील करोनाबळींची संख्या ५ हजारांपलीकडे पोहचल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने सांगितले. तेथील ताज्या बळींमध्ये गेल्या आठवडय़ाअखेर कनेक्टिकटमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ६ आठवडय़ांच्या एका बाळाचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!