Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : दिल्लीत आयोजित धार्मिक कार्यक्रम कोरोना संशयाच्या रडारवर , तेलंगणातील ६ जणांचा मृत्यू

Spread the love

दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची  लागण झाली असून यातील ६ जणांचा तेलंगणमध्ये मृत्यू झाला आहे. यापैकी दोघांचा मृत्यू हा गांधी हॉस्पिटलमध्ये तर इतरांचा अपोलो, ग्लोबल, निजामाबाद आणि गडवाल येथील हॉपिस्टल्समध्ये झाला आहे. या विषयी अधिक माहिती अशी कि , दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकज तबलिगी जमातच्या मुख्यालयात धार्मिक कार्यक्रम आयोजित केला गेला होता. या धार्मिक कार्यक्रमात जवळपास ३०० ते ४०० जण सहभागी झाले होते. यापैकी जवळपास २०० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या पैकी ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे  आढळून आली अशा १६३ जणांना  दिल्लीतील लोकनायक हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आलं आहे.

दिल्लीच्या लोकनायक हॉस्पिटलमध्ये सध्या करोनाचे १७४ रुग्ण दाखल आहेत. यापैकी १६३ जण हे निजामुद्दीनमधील आहेत. रविवारी ८५ जणांना दाखल करण्यात आलं. तर सोमवारी ३४ जण दाखल झाले. हे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्ली सरकारने मरकजच्या मौलानांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन असतानाही मोठा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला आणि त्याची परनावगीही न घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या करोना बाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी निजामुद्दीनमध्ये बसेस दाखल झाल्या आहेत. दरम्यान जे कुणी तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यांनी प्रशासनाला माहिती द्यावी. सर्वांची करोनाची चाचणी केली जाईल. चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील. ज्या कुणाला यासंदर्भात माहिती आहे त्यांनी थेट सरकारला माहिती द्यावी,  असे तेलंगणच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

मशिदीत लपवले १० विदेशी नागरिक 

कोरोनाच्या संकटाचा विळखा लक्षात घेता केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळता यावी म्हणून सरकारने हे पाऊल उचललं आहे. मात्र अशाताच नेवासा येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशातील १० जणांना मशिदीमध्ये लपून ठेवल्याचं उघड झालं आहे. परदेशातील १० जण नेवासा येथील मशिदीत गेल्या आठ दिवसांपासून होते. हा प्रकार उघड झाल्यानंतर नेवासा पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मरकस मस्जिदचे ट्रस्टी जुम्माखान पठाण , सलिम पठाण यांचा समावेश आहे. तसंच मशिदीत लपलेल्या परदेशी नागरिकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या जिबूती, बेनिन, डेकॉर्ट आणि घाना देशातील दहा जणांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्या सर्वांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.

दरम्यान चंद्रपूरच्या एका मशिदी तब्बल १४ मौलवी गेल्या २२ दिवसांपासून लपून बसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर पोलिसांनी मशिदीतून ११ तुर्कस्तानी तर भारतातील इतर भागातील ३ अशा एकूण १४ मौलवींना ताब्यात घेतले. भारतावर एकीकडे कोरोनाचं संकट घोंगावत असताना हे मौलवी चंद्रपूरमधील मशिदीत का लपून राहिले होते, असा प्रश्न निर्माण झाला. या सर्व मौलवींना ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र हे मौलवी चंद्रपूरमध्ये नेमकं लपले होते, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!