#CoronaVirusUpdate : रुग्ण बरे होत असल्याच्या बातम्या दिलासादायक : राजेश टोपे , राज्यात १९६ रुग्ण

Advertisements
Advertisements
Spread the love

कोरोनाशी  राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यशस्वी लढा देत आहेत. राज्यात आतापर्यंत १९६ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यात मुंबईतील १४, तर पुण्यातील १५ जणांचा समावेश असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Advertisements

आपल्या ट्विटमध्ये टोपे यांनी म्हटले आहे कि , राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, ‘पॉझिटिव्ह’ बातमी आली आहे. करोनाशी यशस्वी लढा देऊन राज्यातील ३४ रुग्ण घरी परतले आहेत. या सर्वांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या १९६वर पोहोचली आहे. त्यात मुंबई व ठाणे परिसरात १०७, पुणे ३७, नागपूर १३, अहमदनगर ३, रत्नागिरी १,औरंगाबाद १ ,यवतमाळ ३ , मिरज २५, सातारा २, सिंधुदुर्ग १, कोल्हापूर १ , जळगाव १ आणि बुलडाण्यात १ असे एकूण १९६ रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या रुग्णांपैकी मुंबईतील १४, पुण्यातील १५, नागपूर १ , औरंगाबाद १, यवतमाळ ३ अशा एकूण ३४ रुग्णांना पूर्णपणे बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार