Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , पंतप्रधान मोदी यांचे आर्थिक मदतीचे आवाहन…

Spread the love

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार काटेकोर उपाययोजना करत असून, या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत, तसेच मदत करू इच्छित आहेत. म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-१९ हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था या राज्य सरकारच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात, त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरू करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान, सदर देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (जी) नुसार आयकर कपातीतून १०० टक्के सूट देण्यात येणार आहे.

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch,

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

दरम्यान पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनीही करोनाशी लढण्यासाठी देशातील जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. भारताने कोविड-१९ शी लढाई सुरू केली असून करोनाविरुद्धच्या या लढाईत देशातील सर्व वर्गातील लोकांनी आर्थिक योगदान देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. या मुळे जनतेतून आलेल्या या आर्थिक मदतीचा उपयोग अडचणींवर मात करण्यासाठी होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी जनतेला आवाहन करताना म्हटले आहे . पंतप्रधानांनी ट्विटद्वारे हे आवाहन केले आहे. माझे देशातील जनतेला आवाहन आहे की देशातील जनतेने पीएम-केअर्स फंडात आर्थिक योगदान द्यावे. या फंडाचा उपयोग पुढील काळातील अडचणीच्या काळावर मात करण्यासाठीही करता येणार आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे या फंडाबाबत तपशील सांगणारी एक लिंक देखील शेअर केली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!