#CoronaVirusEffect : राज्यातील ११,००० कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्याचे आदेश

Advertisements
Advertisements
Spread the love

देशातील आणि राज्यातील करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग हाच सध्या एकमेव पर्याय असल्याने राज्याच्या गृहखात्याने या दृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ११,००० कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. याबाबत देशमुख यांनी म्हटले की, ” सात वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळपास ११,००० कैद्यांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील आठवड्याभरात यावर कारवाई व्हावी, अशाही सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार