#CoronaVirusEffect : देशात अन्न -धान्याचा तुटवडा नाही , साठवून ठेवू नका , रामविलास पासवान यांचे आवाहन

Advertisements
Advertisements
Spread the love

देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी सरकार योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करीत आहे लोकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले असून देशातील अन्न धान्य भरपूर असून कोणीही धान्याचा साथ करू नये याबाबत केंद्रीय पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करून म्हटले आहे कि , ‘१ एप्रिल २०२० पर्यंत सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणाऱ्या धान्यात १३५.८ लाख टन तांदूळ आणि ७४.६ लाख टन गव्हाची आवश्यकता आहे. एकूण २१९.४ लाख टन धान्याची गरज आहे. अशावेळी सरकारकडे एकूण ६४६.०९ लाख टनांचा स्टॉक उपलब्ध आहे. याचाच अर्थ आपल्याकडे ४३५.६९ लाख टन अतिरिक्त स्टॉक उपलब्ध आहे’.

Advertisements

दरम्यान  करोनामुळे आपल्या राहत्या भागात ‘लॉकडाऊन’ची परिस्थिती निर्माण झालीच तर अशावेळी गैरसोय नको म्हणून लोक अत्यावश्यक गोष्टी, धान्याचा साठा करू लागलेत. नागरिकांमधली हीच भीती दूर करण्यासाठी अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी हे निवेदन केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही, असं आवाहन पासवान यांनी नागरिकांना केलं आहे. ‘सरकारच्या स्टॉकमध्ये २७२.९० लाख टन तांदूळ आणि १६२.७९ लाख टन गहू आहे. केंद्राच्या सर्क्युलरनुसार, राज्य सरकार एका वेळी सहा महिन्यांपर्यंत सार्वजनिक वितरण प्रणालीचं धान्य घेऊ शकतील. सध्या पंजाब सरकार सहा महिने आणि ओडिसा सरकार एका वेळी दोन महिन्यांचा कोटा घेत आहेत. इतर राज्यातील सरकारही याचा फायदा घेऊ शकतील’ अशी सूचनाही पासवान यांनी राज्य सरकारला केलीय.

Advertisements
Advertisements

‘देशात धान्याची कमतरता नाही त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. याशिवाय खुल्या बाजारातीही OMSS द्वारे विक्री सुरू आहे, यामध्ये तांदळाचे दर २२.५० रुपये प्रती किलो आहे’ असंही पासवान यांनी म्हटलंय. सरकार सध्या साबन, डेटॉल, फरशी किंवा हात धुण्यासाठी वापरले जाणारे क्लीनर आणि थर्मल स्कॅनर यांसारख्या वस्तूंच्या किंमतीवरही सरकारचं लक्ष आहे. यामध्ये आता चेहऱ्यावर लावलं जाणारं मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर याचाही समावेश करण्यात आलाय. करोना संक्रमणाच्या भीतीनं या वस्तूंची मागणी वाढलीय. देशभरात ११४ ठिकाणी या वस्तूंच्या किंमतीवर नजर आहे.

Leave a Reply

आपलं सरकार